“उंदराला, मांजराची साक्ष” ही म्हण समोर ठेवून काम करण्याची आवश्यकता
कुरुंदवाड : शिवनी खोत
शिरोळचे तहसीलदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सुपरिचित असलेले अनिलकुमार हेळकर साहेब, आरोग्य विषयक समस्यांमुळे दीर्घकालीन रजेवर गेल्याचे समजते. त्यांच्या ठिकाणी इचलकरंजी विभागाचे अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता आहे.
शिरोळ तहसील कार्यालयाचा कारभार आपल्याकडे यावा आणि तालुक्यातील शेतकरी नागरिकांचे ओटी भरून “माया-प्रेम” मिळावे याकरिता महिला व पुरुष अधिकाऱ्यानी खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्याकडून ताकद लावली होती. पण, त्यांची ताकद वाया गेल्याची कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात चर्चा आहे.
अतिरिक्त कार्यभार स्वीकारून कामकाज करणाऱ्या प्रभारी तहसीलदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे, गेली एक वर्ष तहसील कार्यालयातील कारभार रामभरोसे चालल्याचे चित्र आहे.पहिल्यांदा वेगवेगळे शैक्षणिक, जातीचे व इतर दाखले सोडण्यासाठी तहसिल कार्यालयाने खिरापती सारखा वाटलेला लॉगइन आयडी, पासवर्ड काढून घेवून अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्याचे महत्वाचे काम करावे लागणार आहे.
कोणत्या पद्धतीचा दाखला आहे. त्यानुसार माया किती खायची हे ठरवले जाते. गोपणिय माहितीनुसार हा कारभार रोहित गुरव कोथळी, शुभम पाटोळे चिंचवाड, समीर कोटीवाले शिरोळ, तेजस कांबळे शिरोळ-नृसिंहवाडी, मुल्ला नांदणी व तहसिल कार्यालयाबाहेर तहसिलचे काम करणारे उमेदवार या बेकायदेशिर लोकांकरवी चालवला जातो. सायंकाळी प्रत्यक्षात किंवा हॉट्स अॅपवरून किती दाखले सोडले? किती माया मिळाली? याची नोंद घेतली जाते.
एकूणच तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार यांच्या गोपणिय होणाऱ्या बैठका, केला जाणारा आराखडा लक्षात घेतला तर, नव्याने कार्यभार स्विकारणाऱ्या तहसिलदारांना किती अंधारात ठेवले जाईल याचा नेम नाही.याशिवाय कानात व पाठमोरी बोलणारे कर्मचारी, उमेदवार कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाची शिकार करतील याचा अंदाज येणे मुश्कील असल्याचे मानले जाते.