निर्दोषात्वाचा दाखला एसीबी देऊन न्यायाधिशांचा भुमिका बजावू नये.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
लाच प्रकरणात तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांच्यावर हस्तकाकरवी लाच मागणी केल्याचा आरोप आहे. यात हेळकर दोषी आहेत किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला नाही. या प्रकरणाचा न्यायालयात पुराव्यावर त्याचा सोक्षमोक्ष व्हावयास पाहिजे. हेळकर निर्दोष असतील तर त्यांचे निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध होईल. त्यांना निर्दोषत्वाचा दाखला देवून लाच लुचपत विभागाने न्यायाधिशाची भुमिका वटवू नये. असा सुचक इशारा तक्रारदाराने दिला आहे.
शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांचे नाव आरोपी म्हणून वगळले? या गंभीर प्रकरणाची चौकशी करावी,आरोपी न केल्यास प्रकरण उच्च न्यायालयात जाणार या “खमक्या”ती वृत्तानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षकार, नागरिक, शेतकरी यांच्या भुवया उंचावल्या असून महसूल क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याचबरोबर सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे आदेश राज्य पातळीवरून करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच कार्यवाही सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, तक्रार अनुषंगाने शिरोळ तहसील कार्यालयातील त्या “तीन” कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी विधाने करून “फाजील आत्मविश्वास” नोंदवण्याचा “केविलवाणा” प्रयत्न सुरू केला आहे. परंतू, सन 2021 मध्ये कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने इचलकरंजी नगरपालिकेत केलेली कारवाई निश्चितच डोळ्यावरील धुके बाजूला करण्यास पोषक ठरेल यात शंका नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इचलकरंजी नगरपालिकेत कारवाई करून नगर रचना विभागाचे अभियंता बबन कृष्णाजी खोत व कार्यालयातील उमेदवार किरण कुमार कोकाटे यांच्यावर 25 हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. याची शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे 583/2021 ने फिर्याद दाखल करण्यात आली.
स्विकारण्यात आलेली लाच मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल व नगर रचनाकार रणजीत कोरे यांच्याकरिता स्विकारण्यात आली असताना केवळ खोत व कोकाटे या दोघा विरुद्धच गुन्हा का दाखल केला?. इतर दोघावर गुन्हा का दाखल नाही?. अन्य दोघांना का वगळण्यात आले, याच्या मुळापर्यंत जाऊन सत्य वस्तूस्थित शहरवासियासमोर आणण्यासाठी सामाजिक स्तरावरील कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली.
चौकशीअंती तब्बल चार वर्षा नंतर तत्कालीन मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल व नगर रचनाकार रणजीत कोरे यांच्याविरुद्ध लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेंगल व कोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एफआयआर रद्द होण्यासाठी अर्ज केला. परंतु, न्यायालयाने दावा फेटाळून लावला.
सध्या, हा खटला इचलकरंजी जिल्हा न्यायालयात (48/2025) सुरु आहे. हे एकच प्रकरण वा घटना वाचाळ वीरांच्या “फाजील आत्मविश्वासा”ला पूरून उरणारी ठरेल असा तक्राराने विश्वास नोंदवला आहे. लाचलुचपत ने इचलकरंजी प्रकरणात एक न्याय आणि हेळकरांना दुसरा न्याय अशी मनमानी भुमिका घेतल्यास एसीबीला न्यायालयान खेचण्याची तयारी तक्रारदाराने केली आहे.
हेळकरांच्या अनुपस्थित त्यांच्या कामकाजाचे तालुक्यातून कौतूक
सर्वच विभागात उल्लेखनिय कामकाज, जनसेवा हिच देशसेवा
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ तालुक्याचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना कर्तव्यावर असताना मुर्छा आल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची चर्चा शिरोळ तहसील कार्यालयाच्या कर्मचारी वर्तुळात आहे. त्याचबरोबर तहसीलदार यांना आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याची वार्ता तालुक्यात असून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांनी लवकरात लवकर शिरोळ स्थित यावे यासाठी प्रार्थना केली जात आहे.
तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांचे, सुरुवातीपासून देशावरचे अफाट प्रेम आणि राज्य शासनाचा महसूल वाढवण्याची सतत धडपड होती. त्यांचा आदर्श घेऊन शिरोळ तालुक्यातील महसुल कर्मचारी, न्यायालयाचा निर्णय, आदेश बाजूला ठेवून जीवाची बाजी करीत महसुलात भर टाकत आहेत. सध्या, “त्या” कामकाजाची कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा असून जादा महसुल देणाऱ्या “त्या” कर्मचाऱ्याचा “गम्मती जम्मती”ने “गौरव” सुध्दा केला जात आहे.
आपल्या कार्यकाळात तहसीलदार हेळकर यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने कामकाज करीत त्यांनी अनेकांना न्याय दिला. कार्यालयात बेकायदेशीरपणे, बिन शासकीय लोकांना घेऊन कामकाज करणे चुकीचे असताना सुद्धा त्यांनी शासनाच्या नियम अटी शर्तीला बगल देत 22 उमेदवारांना (एक महिला वगळून) घेवून जनसेवा केली. एजंटा करवी त्यांच्या पोट पाण्याचा बंदोबस्त केला. जमीन वर्ग एक व दोन विभागाला “आर्थिक कणा” बनवून डोलारा सांभाळला.
शासनाने घरकुल बांधकामासाठी मोफत वाळू हा उपक्रम सुरू केल्यानंतर कृष्णा नदी पात्रात कायदेशीरपणे त्या “तीन” ठेक्याच्या माध्यमातून वाळू उपसा सुरू केला. संपूर्ण वाळू शासनाच्या धोरणानुसार गोरगरिबांच्या बांधकामासाठी पुरवठा केली. या सत्कर्मामुळे गोरगरिबांच्या बांधकामाचे दर महिन्याला “बारा लाख मोलाचे” काम केले. शेतकऱ्यांना “शेती रस्ता” काढून देताना त्यांनी “मेरीट” नुसार दिलेल्या योगदानाची किंमत “अंकात” करणे शक्य नाही.
गट नंबर 307 पासून गट नंबर 318 पर्यंत शासकीय नियमातून, हरित लवादाच्या अटी शर्तींचे पालन करीत, दगड उत्खनन व त्यावर प्रक्रिया करणारे स्टोन क्रशर चालू ठेवले. एक दगड व एक स्टोन क्रेशर पासून उत्पन्नात दर महिन्याला ” पाच लाखाची” भर टाकली. त्याचबरोबर गरजूंना वेळेत मुरूम पुरवठा व्हावा म्हणून कर्नाटकातून येणाऱ्या मुरुमाच्या माध्यमातून दर महिन्याला शासनाच्या उत्पन्नात ” तीन लाख वीस” हजारांची वाढ केली.
गौण खनिजाच्या माध्यमातून शासनाच्या उत्पन्नात वाढ करताना त्यांनी शेतकरी समस्यावर उतारा म्हणून “कायद्याची” सांगड घालायला लावून, भोगवटदार एक व दोन, कुळ, इनाम व खंडाच्या जमिनी, देवस्थानच्या जमिनी, बिगर शेती, पुनर्वसन, ब्लॉक काढणे यासह अन्य कामे “आर्थिक कणा” असणाऱ्या विभागाच्या माध्यमातून सोडवत उत्पन्नाची “उंची” वाढवली.
नागरी समस्यावर तोडगा काढण्याची पद्धत, हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर असलेला सर्व प्रकारचा विश्वास आणि प्रेम या जोरावर हेळकर यांनी “आदर्श तहसिलदार” म्हणून पूरस्कार मिळवला. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला वाळूने शारीरिक दृष्टया कमजोर बनवले, ही दु:खाची बाब म्हटले तर वावगे ठरणारे नाही.
हेळकर यांनी तहसिलदार पदाच्या कार्यकालात डॅशिंग कामकाज करून शासनाच्या उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न केला.भोत्रास्थित सीना नदी पात्रात तीन ट्रॅक्टर भोत्रा-परंडा मार्गावरील खडके वस्ती येथे वाळू धुण्यासाठी आल्याची माहिती बार्शीचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना मिळाली.आणि कारवाईसाठी गेलेल्या हेळकर यांच्यावर हल्ला झाला.
गोपणिय माहितीच्या आधारे हेळकर यांनी महसूल विभागातील कर्मचारी आकाश बाभळे, तलाठी चंद्रकांत सूर्यवंशी आणि कोतवाल आशिष ठाकूर यांना सोबत घेवून ट्रॅक्टर ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली. कारवाई सुरु असताना एका ट्रॅक्टरने पळून जाण्याच्या प्रयत्न केला.हेळकर यांनी तो ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला पण, ते ट्रॉलीखाली चिरडले. यात हेळकर यांच्या कबंरेवरुन ट्रॅक्टर गेले.
यात हेळकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचे सिटी स्कॅन करण्यात आले. त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली होती. सुदैवाने त्यांच्या पाठीच्या कण्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोलापूर किंवा पुणे याठिकाणी पुढील उपचारासाठी त्यांना नेण्याची तयारी करण्यात आली.
पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच तत्कालीन पोलीस निरीक्षक एकबाल सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरुन आरोपीसह तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. आणि पंचनामा पोलीस प्रशासनाकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आला.