“फाजील आत्मविश्वास” नडणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता
शिरोळ : विशेष प्रतिनिधी
शिरोळ तहसील कार्यालयात बेकायदेशीर रित्या, शासनाशी कोणताही संबंध नसताना शासकीय कागदपत्रे हाताळणाऱ्या 22 उमेदवारांना बाहेर काढावे अशा तक्रारी बरोबर तहसील कार्यालयात खुर्ची टेबल टाकून काम करण्यासाठी जागा मिळावी अशा आशियाची मागणी करण्यात आली आहे. या अनुषंगाने कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक व शिरोळ पोलीस ठाणे यांना मेल द्वारे निवेदन देऊन कळवण्यात आले आहे.
मनातील हेतू साध्य करण्यासाठी मनमानी पद्धतीने केले जाणारे कामकाज, स्वतःचे अवैद्य कामकाज झाकून ठेवून दुसऱ्याचे वैद्य कामकाज वाकून पाहणे, चोर सोडून संन्याशाला फाशी देणे, शेतकरी, पक्षकार, नागरिकांची पिळवणूक, नागरिकांची सनद कायद्याला कचऱ्याच्या टोपलीच्या मार्ग, वेगवेगळ्या प्रकारचे दाखले, जन्म मृत्यू, चाप्टर केस अशा अन्यायी कामकाजातून तक्रारदाराने, तक्रार व मागणी केल्याचे अधिकृतरित्या समजून येत आहे.
शिरोळ तहसील कार्यालयातील आस्थापना, रेकॉर्ड विभाग, सेतू या ठिकाणच्या कामकाजाची संपूर्ण मदार निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील यांनी 22 उमेदवारांना घेऊन उत्कृष्ट पध्दतीने पेलेली आहे. तहसील कार्यालयाच्या अन्यायी कामकाज पद्धतीचा पहिला फटका उमेदवारांना बसून त्यांचे भवितव्य अंधारमय होण्याची शक्यता गडद झाली आहे. त्यामुळे करणार एक आणि शिक्षा दुसऱ्याला का असा जाब विचारण्याची गरज आहे.
या प्रकरणात काही उमेदवारांनी फाजील आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केल्यास तो त्यांना नडणार असल्याची चर्चा आहे. एकजुटीने एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिकाच उमेदवारांना जीवनदान देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील कोणता निर्णय घेणार? या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी कायद्याचा बडगा येण्यापूर्वी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या ओळीची आठवण करावी.
तहसील कार्यालयाला शिरोळातील युवक, तरुण चालत नाहीत?
शिरोळ तहसील कार्यालय हे शिरोळ मध्ये आहे. परंतु, या ठिकाणी उमेदवार म्हणून काम करणारे 80 टक्के युवक तरुण-तरुणी बाहेर गावचे आहेत. शिरोळ शहरातील युवक, तरुणांना या कामासाठी योग्य मानले जात नाही?. याचा विचार होण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.