प्रत्येक वर्षी “मार्च एंडिंग”च्या नावाखाली बँका, मिनी बँक, पतसंस्था, खाजगी सावकारी, परवानाधारक सावकारी, व्यापारी, उद्योग, व्यवसायिकांकडून सर्व स्तरावरील नागरिकांमागे वसुलीचा ससेमिरा लावला जातोच. बँकिंग क्षेत्रा संबधी कर्जदारांचे अज्ञान याचा फायदा घेऊन एका मॅनेजर ( R’वी देवाचा भक्त R’हूल तथा कॅप्टन अशोक खरात) कडून थेट सर्वसामान्यांचा “एंड” केला जात आहे. छ.जयसिंग नगरीत बसून “अनेकां”चा “अंत” करण्यासाठी त्या “संस्था” मॅनेजरने सावकारी व्याजाच्या पैशाने खिसे भरण्यासाठी “चाणक्य” नीति वापरल्याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.
तुम्हाला मी, खाजगी (मान घेणारा B’ळू) सावकाराला 10 टक्क्याने पैसे द्यायला सांगतो (पैसे R’हुल तथा कॅप्टन खरातचे). तेच पैसे संस्थेत भरून खाते निल करा, पुन्हा कर्ज देतो, कर्ज मंजुरीनंतर पहिला व्याजासह (मान घेणाऱ्या B’ळू) सावकाराचे कर्ज भागवा (व्याजात R’हुल व B’ळूची 50:50 टक्क्याची वाटणी), अशी “लुटमारी”ची यंत्रणा त्या गावात लावल्याची चर्चा आहे.
छोट्याशा गावातील गरजवंतांना कर्जाच्या माध्यमातून पैसे वाटप करताना (R’हुल तथा कॅप्टन अशोक खरात) ने अतिशय धुर्तखेळी केल्याचे चर्चेत आहे. ग्रामीण गावात कर्ज वसुलीच्या नावाखाली कर्जदाराच्या “सौंदर्या”चे “विद्रुपीकरण” करण्याची “लंपटगिरी” मनात ठेवून त्याने फायदा उठवल्याची चर्चा आहे. लंपटगिरी करणाऱ्या महाभागाने आपल्या ह्रदयाच्या देव मंदिरात चक्क एका R’वी देवाचा फोटो लावून दररोज पुजेवेळी “पपई”च्या “फोडी”चा नैवेद्य दाखवत असल्याचे त्या गावातील ग्रामस्थातून बोलले जात आहे.
शेतकऱ्यांचा गळा घोटून त्यांची फसवणूक करून मिळवलेल्या पैशातून उत्तर भारत दौरा करुन शिल्लक राहिलेले पैसे आणि संस्थेत ढापाढापी केलेले पैसे, मान घेणाऱ्या B’ळूच्या तिजोरीत ठेवून त्यावर 10 टक्क्याने खाजगी सावकारी सुरू करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणी काही पीडित कर्जदार पुढे येणार असल्याचे समजते. पिडितांनी सत्य वस्तुस्थिती पोलिसांसमोर कथन केल्यास खाजगी सावकारी, लंपटगिरी, संस्थेतील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची फसवणूक अशी अनेक प्रकरणे बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे.