पाठीशी घालण्याऐवजी पोलीसात गुन्हा का दाखल केला नाही?.
शिरोळ : योगेश पाटील
शिरोळ तहसील कार्यालयाचे रजेवर गेलेले तहसीलदार अनिलकुमार हेळकर हे रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या डिसाईनचा बेकायदा वापर करून उदगाव येथील एका पक्षकाराच्या उत्पन्नाचा दाखला सोडण्याची खळबळ जनक माहिती पुढे आली आहे. सदरचा दाखला दोघा उमेदवारांनी संगनमत करून, हजारोच्या तुलनेत “माया-प्रेम” घेवून परस्पर सोडून “वाटोळे” या शब्दाला “तेज” आणल्याचे समजते. सदरचे प्रकरण लक्षात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती बाहेर पडल्यास कार्यालयातील साईनचोरी, बेकायदेशीर आणि अंधाधुंद गैरकारभार, गैरकामकाज चव्हाट्यावर येईल या भीतीने तो दाखला थांबवल्याचे समजते.
संबधीत अधिकाऱ्याने लागलीच, कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर बसून, बेकायदा अधिकाऱ्यांच्या लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून वेगवेगळे दाखले सोडणाऱ्या त्या दोघा उमेदवारांना बोलावून घेऊन अगदी सौम्य भाषेत समज दिली. आणि हेळकर यांच्या डिसाईनने दिलेला दाखला रोखला व दुसऱ्या डिसाईनचा दाखला दिल्याची चर्चा तहसिल वर्तुळात आहे.
तहसील कार्यालयाचे प्रमुख रजेवर असताना त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्याच डिसाईनचा वापर करून दाखले सोडले जात असतील तर, यापूर्वी असे किती बेकायदा कामकाज करण्यात आले असेल? किती “माया-प्रेम” घेतले असेल? याला कोणाचे पाठबळ आहे?. याची सखोल चौकशी करून कारवाई करावी या मागणी बरोबर सवालात्मक चर्चेला तालुक्यात पाय फुटल्याचे समजून येत आहे. अधिकाऱ्यांच्या डिसाईनचा गैरवापर करून गैरकारभार केला जात असल्याच्या गंभीर प्रकरणावर कडक शासन, हकालपट्टी करण्याऐवजी या प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांचा पडदा टाकण्याचा प्रयत्न का? पोलिसात गुन्हा का दाखल केला नाही?. पुन्हा त्याच उमेदवारांना दाखले का सोडायला लावले? याबद्दल शिरोळ तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
हेळकर साहेब रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी कार्यभार स्वीकारलेले नवे तहसीलदार महेश खिलारी साहेब यांची डिसाईन सध्या, याच उमेदवारांच्या ताब्यात असल्याचे समजून येत आहे. हेळकरसो यांच्या डिसाईन प्रमाणे, खिलारी साहेब यांच्या डिसाईनचा गैरवापर करून गैर कामकाज केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वेळीच सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता अधिकाऱ्यांचा, लॉगिन आयडी पासवर्ड, डिसाईन वापरण्याचा अधिकार उमेदवारांना कोणी दिला? या प्रशासकीय कामकाजाची तालुक्यात उलट चर्चा सुरू झाली आहे.
यांच्याकडे बेकायदेशीर कामकाज करण्याचे ताम्रपत्र?
एखाद्या बेकायदेशीर, गैरकामकाजाला उघड पाठबळ आणि कायदेशीर कामाला लाखांचा दंड. अशा “हम करे सो” कायद्याची शस्त्रक्रिया वेळीच करण्याची आवश्यकता आहे. सध्या हा कॅन्सर बळावत चालला आहे. जसे इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि दिडशे वर्षे देशाचे मालक बनले. भारतीयांना गुलाम बनवले अशी आवस्था निर्माण होण्यापुर्वी “जागृकता” आणि “गंभीरता” हे दोन शब्द आधोरेखित करण्याची आवश्यकता असल्याचे जाणकार बोलताहेत.
पुढील बातमी : कॅप्टन अशोक खरात यांचा पट शिष्य कर्मचारी, कॅप्टन “लाटीभोत” या भोंदू बाबांच्या ईस्त्री लंपटगिरीच्या करामती.