“बाळू” नामकाने खाजगी सावकारीतून “मान” मिळवण्यासाठी “गावे-गावे” पिंजून काढून “चाळीस”हून अधिक अबलांचे केले शोषण ?
शिरोळ पोलीस, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी “बाळू”ची खाजगी सावकारी मोडून काढण्याची पिडितांनी केली मागणी.
हसूर/शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
कुटवाड (ता.शिरोळ) येथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या नावावर बेकायदेशीर “खाजगी सावकारी” सुरू असल्याची खोटी तक्रार देऊन तालुका पातळीवर सामाजिक काम करणारा कार्यकर्ता व गाव स्तरावर सामाजीक काम करणाऱ्या व्यक्तीला “बदनाम” करण्याचे “षडयंत्र” काहींनी करून दिशाभूल करण्याचे काम केल्याची चर्चा शिरोळ तालुक्यात सुरू असल्याचे कळते.दरम्यान, “चोर सोडून संन्याशाला फाशी” दिली जात असल्याची, “खंत” सुद्धा व्यक्त केली जात असल्याचे चर्चेत आहे.
शिरोळ पोलीस, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शिरोळ शहराच्या “पूर्व” दिशेला “कृष्णा” नदीकाठच्या एका शेवटच्या गावातील “मूर्ती लहान पण, कीर्ती महान” अशा एका “बाळू” नामकाने खाजगी सावकारीच्या माध्यमातून “मान” मिळवण्याच्या हव्यासापोटी “गावे-गावे” पिंजून “चाळीस”हून अधिक अबलांचे शोषण करणाऱ्यावर आतापर्यंत का कारवाई केली नाही ? असा संताप जनक सवाल केला जात असल्याची चर्चा आहे.
“बाळू” नामक खाजगी सावकाराने भरमसाठ व्याजाने पैसे देऊन एका कुटुंबाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केल्याची चर्चा आजही केली जात आहे. “स्त्रीत्वाचा दागिना” हडपण्याच्या प्रयत्नाविरुद्ध पती-पत्नीने गावातच उपोषण सुरू केले. “विष प्राशन” करून “आत्महत्या” करण्याचा प्रयत्न केल्याची आजही चर्चा आहे.
खाजगी सावकार “बाळू” नामकाचा “आदर्श” घेण्यासारखा आहे, खाजगी सावकारी तील “असुर” म्हणून त्याने नावलौकिक मिळवला आहे. हा “बाळू” एकाचे “दोन” करीत नाही. तर, एकाचे “दहा” करणारा “इरसाल” खाजगी सावकार असल्याचे बोलले जाते. व्याजाने पैसे घेतलेल्या इसमाने काम करून मिळवून आणलेले पैसे “बाळू”च्या हातात द्यायचे, आणि “बाळू”ने उधारी भागवून उरलेले “व्याजा”त ठेवायचे असा अलिखित “कारनामा” असल्याची चर्चा आहे.
जसे एकादी “व्हीव्हीआयएमपी” व्यक्ती येणार म्हटल्यानंतर संपूर्ण एरिया “बॅन” करून “नो एन्ट्री” केली जाते, तसे व्याजांनी पैसे घेतलेल्यांच्याकडे, व्याज मागणीसाठी “बाळू”ची एन्ट्री होणार म्हटले की, परिसर, घरामध्ये मालकासह इतरांना “नो एन्ट्री” असा कायदा “बाळू”ने लागू केला असल्याचे चर्चेत आहे.