“पुढारपण” करण्यात पटाईत असणाऱ्या “पिता-पुत्रांच्या” घाणेरड्या वृत्तीमुळे त्यांची महाराष्ट्रात कधीही “सकाळ” झाली नाही. मागे “लोक, मत” सुध्दा नाही.
2019 व 2021 मध्ये गोळा झालेल्या मदतीच्या पैशातून आलिशान गाडी घेणाऱ्याला “पद्मश्री” पुरस्कार द्यायला हवा.
कोल्हापूर/शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या आवाहनानंतर जिल्ह्यातील नागरिकांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त आणि बेघर व संसार नष्ट झालेले नागरिकांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने कशी जास्तीत जास्त मदत करता येईल. असा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
सन 2019 आणि 2021 मध्ये अलमट्टी धरणाच्या “प्रतापा”मुळे प्रलयकारी महापुर आला. त्यावेळी या “प्रतापी” व्यावसायिक ट्रस्टने बेकायदा कोट्यावधी रुपये गोळा केले. गोळा झालेल्या कोट्यावधीच्या रकमेतून प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांना स्वतःच्या व्यवसायाचे नाव टाकून काही वस्तू दिल्या. परंतु, महापुर पीडितांना एक रुपयाची सुध्दा मदत दिली नाही.उलट “योग” साधत याच पैशातून मुलाला कोट्यावधीची आलिशान गाडी घेतली. असा “प्रताप” त्या दोघा “पिता-पुत्रांनी” केल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात होती व आहे. अशा पिता-पुत्रांना खऱ्या अर्थाने “पद्मश्री” सारखा पुरस्कार द्यायला हवा अशी तिरकस टीका होत असल्याचे कळते.
कोल्हापूर जिल्ह्यात “पुढारपण” करण्यात पटाईत असल्याची खोटी फुशारकी मारणाऱ्या या “पिता-पुत्रांनी” मिळालेल्या संधीचा फायदा घेत दानशूर तसेच मतदगार व्यक्तींच्या पैशावर कोट्यावधी रुपयांचा डल्ला मारला. “पिता -पुत्रांच्या” या घाणेरड्या वृत्तीमुळे त्यांची आज तागायत महाराष्ट्रात कधीही “सकाळ” झाली नाही. मागे “लोक, मत” सुध्दा नाही.”हुडव्या” भोवती “शेणी” गोळा करणे आणि लोकांच्या खिशातील पैसे काढून घेऊन स्वतःचा विकास करणे, उदरनिर्वाह चालवणे हा त्यांचा सुरुवातीपासून विकसित धंदा असल्याचे लोक बोलतात.
मराठवाड्यातील पूरग्रस्ताप्रति दानशूरांच्या मनातील भावनांचा अंदाज घेऊन,”पिता-पुत्र” आणि त्यांनी पाळलेला व कोपऱ्यात बांधून ठेवलेला श्वान “भा’निल” ही संधीसाधू मंडळी व्यावसायिक संस्था-ट्रस्ट संघटनांच्या नावावर आवाहन करण्याच्या तयारीत आहेत. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत, या नावाखाली कोट्यावधी रुपये गोळा करणार. त्यातील तुटपुंजी रक्कम पडितांना देवून उर्वरित रक्कमेवर डल्ला मारणार ! त्यामुळे “पिता-पुत्रांच्या” व्यावसायिक ट्रस्टच्या आवाहनाला कोणाही बळी पडून नये, “त्या” ट्रस्टला मदत करू नये, असा सूर कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचे समजते.