तालुक्यात भाजपाची ताकद नगण्य? राजश्री शाहू आघाडी बरोबर युती?
जयसिंगपूर/शिरोळ/कुरुंदवाड : शरद काळे
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, महामेळाव्यात आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढतील अशी स्पष्ट आणि जाहीर घोषणा केली. पण, निवडणुकीच्या लगीन घाईत कमळ चिन्हाची किमान पाकळी तर दिसावी अशी अपेक्षा सर्वसामान्य मतदार करीत असल्याची शहरात चर्चा आहे.
देशात आणि राज्यात सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजप पक्षाकडे पाहिले जाते. पण, हाच पक्ष जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र उतरताना कुठे दिसत नाही. त्यामुळे भाजपची शिरोळ तालुक्यात ताकद मर्यादित किंवा नगण्य असावी ? अशी सवालात्मक शंका उपस्थित केली जात असल्याचे समजते. खेरीज पाडव्यानंतर जागा वाटप व चिन्हावर चर्चा होणार होती ?
नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये भाजपा हा राजर्षी शाहू आघाडीशी युती करणार अशी चर्चा आहे. याचाच अर्थ, राजर्षी शाहू आघाडीची नगरपरिषदा कार्यक्षेत्रात भाजपा पेक्षा जादा ताकद आहे ?. म्हणूनच भाजपा जाहीर रित्या मतदारांसमोर यायला चाचपटत असल्याचे तर्फे-वितर्क मतदारातून बांधले जात असल्याचे समजून येत आहे.
पर्यायाने भाजपाला नगरपरिषदा निवडणूक निमित्ताने राजर्षी शाहू आघाडीचे चिन्ह घराघरात पोहोचवणे आता सहजगत्या शक्य होणार असल्याची चर्चा आहे. मर्यादित किंवा नगण्य ताकद ? यामुळेच भाजपा हा राजर्षी शाहू आघाडीशी युती करीत आहे का?. पण, जाहीर घोषणेप्रमाणे भाजपा कमळ चिन्हावर निवडणूक लढला नाही तर त्यांच्या शिरोळ तालुक्यातील अस्तित्वाबाबत शंकेला वाव मिळणार आहे.