भ्रष्ट पैशातून दाखवलेले अमिष, दिलेली देणगी व मिष्ठांन्नाचे मतदारांना अपचन
शिरोळ : शरद काळे
शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा प्रभागांमध्ये “नगरसेवक” पदाचे इच्छुक उमेदवार “घर टू घर” भेटी देऊन बांधणी करताना दिसत आहेत. त्याचबरोबर “नगराध्यक्ष” पदाचे उमेदवार सुद्धा गाठीभेटीच्या माध्यमातून “मिष्ठान्न”चे अमिष देऊन मतदारांना तुम्ही किती “लाचार” आहात असा दाखवण्याचा प्रयत्न करून पैशाची “ऐट” दाखवत असल्याची चर्चा शिरोळ शहरात रंगली आहे.
वास्तविक पाहता, मतदारांना “लाचार” असे “हिणवून” पैशाची “ऐट” दाखवणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवाराच्या सग्याकडे एवढा पैसा आला कुठून ? त्यांनी कोणकोणत्या संस्था ? टेंडर ? जागा, जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, आणि स्वतःची पोथडी भरून घेतली. अशी सवालात्मक उलट सुलट चर्चा होत असून, यांचा यावेळी सुपडासाफ करा, असा समुदायाने अंतर्गत प्रचार सुरू केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील वातावरण तापण्याऐवजी मतदारांना अमिष दाखवून का कमी लेखण्यात येत आहे ? यावरच अधिक गरमागरमीची चर्चा सुरू आहे. मागील काही वर्षात दिवाळीचा सण आला नाही का ? शहरातील मतदारांनी दिवाळी केली नव्हती का ? मग आताच दिवाळी सणानिमित्त मिष्ठांन्नाचा एवढा पुळका कशासाठी ? असा सवाल केला जात असल्याचे समजते.
सगळं आम्हालाच पाहिजे, आमच्याच घरात पाहिजे, अशी वृत्ती, प्रवृत्ती सांभाळणाऱ्यांना आतापासूनच ठेचून काढायला सुरुवात केली पाहिजे. यांना सगळं घरात देवून सुध्दा समुदाय, गावासाठी काय केलं आहे ? भ्रष्टाचाराच्या पैशातून देणगी दिली म्हणजे घाम गाळला असे होत नाही. त्यामुळे आतापासूनच “पराभव” करण्याच्या तयारीला लागा. अशा सुचना समुदायातील लोक एकमेकांना देत असल्याचे समजून येत आहे.