“मनी” भाई का प्यारा !, सत्तेचा “अमरपट्टा” आज याच्या, तर उद्या दुसऱ्याच्या “गळ्यात”
शिरोळकरांनी, विकास, टक्केवारी, राजकीय स्टॅटर्जी, व्यापारी धोरण अनुभवल्याची चर्चा !
शिरोळ : शरद काळे
ऊस दराच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी व शेतकरी चळवळीने शनिवारी बंद पुकारला होता. संपूर्ण शहर बंद होते. शहरावर निषेधाची कळा पसरली होती तरी देखिल आमदार बंधू संजय पाटील यड्रावकर दिवसभर आणि सायंकाळी आम. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अबोल राहून शहरात उपस्थिती ठेवली.
परंतू, दोघा बंधूनी ऊस दराच्या प्रश्नावर कोणते भाष्य केले का ? नाही ?, मारहानीत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची चौकशी केली का ? नाही ?,आमदारांनी आमचा कारखाना उसाला अमुक अमुक एवढा दर देणार आहे असे सांगितले का ? नाही ? शेतकरी चळवळीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी किती दर देणार अशी विचारणा केली का ? नाही ? शहरावर निषेधाची कळा असल्यामुळे कोणीच बोलण्याचे धाडस केले नाही असे म्हणायचे का ? नाही ?
तर, सर्वांनी ठरवून हा विषय टाळला अस म्हणायचं काय ? होय ? कारण अतंर्गत साटे लोट आणि एकमेकांचे हातात हात असावेत ? म्हणून कुठेतरी पाणी मुरतयं असं म्हणायचं ? होय ? मारहाण करणारे दत्त साखरचे समर्थक होते म्हणून ? होय ? होय, म्हटलं तर वावग ठरेल काय ? या तर्कवितर्काने अनेकांच्या डोक्याचा “भुगा” झाल्याची चर्चा असल्याचे समजते. याशिवाय खास. माने यांनी सुद्धा यावर कोणतेही भाष्य केले नाही याचे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमदार बंधूनी ज्या कामासाठी तेच जुने व मर्यादीत लोक घेवून, तिच कुदळं, टिकावं, कात्री याचा वापर केला, त्या कामाची शासन स्तरावरील परिस्थिती काय आहे ? या माहिती बरोबर शासनाच्या तिजोरीतून परतून आलेल्या करातून प्रत्यक्षात 70 टक्के तर काम होणार काय ? याची नागरीकांनी दक्ष राहून माहिती घेण्याची गरज असल्याची चर्चा आहे.एकूणच शिरोळ शहरावर निषेधाची कळा असताना कोणीच, कोणत्याही विषयावर तोड उघडले नाही.या मागे शहवासियांमधील निराशा आणि अत्यल्प प्रतिसाद हिच कारणे असल्याची नागरीकात चर्चा आहे.