पराभवाच्या भितीने “टग्या”चे खुनशी राजकारण, सभागृहात जाण्यासाठी कुटील डाव
शिरोळ/जयसिंगपूर/कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक आणि ऊस दर आंदोलन पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीबरोबर गणपतराव पाटील, राजू शेट्टी, यांना शेतकरी मतदारात बदनाम करण्याचा, तिघांनी कट कारस्थान रचल्याची खळबळ जनक माहिती समजून आली आहे.
मगरीचा जबडा आणि कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारातून तोंडाला रक्त लागलेल्या “टग्या”ला खुर्चीची इच्छा पूर्ण होणार नसल्याचा अंदाज आला असल्याचे समजते. निराशा आणि आत्ताच पराभवाच्या खाईत पडलेल्या टग्याने, पाठबळ दिलेल्या एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून, जयसिंगपुरातील एकाला हाताशी धरून स्थानिक निवडणूकीचे मतदान पारड्यात पाडून घेण्यासाठी परफेक्ट कार्यक्रम आखण्याबरोबर, लाखोंची रसद पुरवल्याची चर्चा आहे.
लाखोंची रसद स्वीकारणाऱ्याने, कुटील डाव करणाऱ्या टग्याला, चरण्यासाठी मैदान खुले ठेवले होते, असे बोलले जात आहे.सध्या, ऊस दर आंदोलन आणि शक्तीपीठ महामार्ग तसेच वेगवेगळ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून राजू शेट्टी यांनी सरकारी यंत्रणेला घाम फोडला आहे. त्यामुळे शेट्टी यांची मतदार संघात क्रेझ वाढली आहे. दत्त कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील यांनी सुध्दा निवडणुकीच्या टप्प्यात, आर्थिक त्रास देणाऱ्या व्यक्तींना खड्यासारखे बाजूला केले आहे.
त्या टग्याने, जयसिंगपूरातील एकाच्या मदतीने दत्त साखर व स्वाभिमानी यांची बदनामी होईल असा ट्रॅप लावण्याचे फर्माण काढल्याची चर्चा आहे. उस दरावरून, दत्त कारखाना शेतकरी विरोधी कारवाया करतोय अशा अफवा पसरवा, आंदोलनाला हिंसक वळण लागेल असा प्रयत्न करा, दोघा बद्दल नागरीक मतदारांत, मतदार संघात असंतोष निर्माण करा, बदनाम करा, यासाठी जोर लावा.जेणेकरून निराश मतदार बाजूला जातील, माझा सभागृहात जाण्याचा मार्ग मोकळा होईल.सत्तेचा “अमरपट्टा” कायम गळ्यात राहिल असा कुटील डाव केल्याचे समजून येत आहे.
तसे पाहिले तर, दत्त साखरचे व्यवस्थापन स्वहित साधण्याची दृष्टी ठेवून अनेक वर्षे पारदर्शी कारभाराचे गाजर दाखवत असल्याचे आजही सभासद शेतकरी बोलत असल्याचे समजते. त्यात फसलेले विस्तारीकरण, कोट्यावधी रुपयांच्या चोरीचे प्रकरण, निकृष्ट दर्जाची रासायनिक खते, सोयाबीन प्रकल्पातील गैरव्यवहार, मर्जीतल्यांना ठेका आणि समुदाय वर्गाला नोकरी अशा विविध कारभाराची तालुक्यात दररोज उलट सुलट चर्चा होत असल्याचे समजते.