“32 हजार” बुडव्याचा 3 कोटींचा कार्यक्रम स्वतःसाठी की, सटासाठी की, परस्पर ?
शिरोळ : शरद काळे
पोरगा म्हणतोय, एवढे पैसे त्याला का द्यायचे ? बाप म्हणतोय, तुला काय कळतय, गप्प बस्स, ज्याच्यासाठी जमीन हडप केली, तोच महा”देव” “छत्रपती ताराराणीं”च्या घोड्यावरुन स्वार होऊन येईल. त्याला कुतवायलाच लावतो, मग बघूया काय करतोय ते ! असा संवाद एका बापलेकांच्यात झाल्याची चर्चा शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरीत सुरू आहे.
त्या महाशयांची ही भाषा नेमकी कोणासाठी असेल, यासाठी “यड” लाऊन घेऊन “राजसाहेब”च्या नावासाठी कौल लावण्याची गरज नसल्याचे नागरिक बोलत आहेत. एक नंबरची खुर्ची काटेरी असो किंवा मखमलीत ? ती मिळणारच नाही, तरी सुद्धा इतकी खुमखुमीची भाषा कशासाठी ? कशावर ? गांधी बापू वरच ना ? पण, काळजी करण्यासारख काहीच नाही, कारण तुम्ही जनतेच्या मनातच नाही आणि स्वीकारणार सुद्धा नाही.
एका “32 हजार” “बुडव्या” बहाद्दराने, खुमखुमी दाखवणाऱ्या “गांधी बापू” ला वॉर्निंग दिल्याचे समजते. स्वतंत्र 50 लाख द्या, तुमच्या बरोबरच राहतो, बाकीच्या 20 जणांचे 10 लाख प्रमाणे 2 कोटी जमा करा. एकत्रीत लढण्यासाठी संपूर्ण सटाला एक कोटी द्या, याशिवाय शिरोळ,जयसिंगपूर ,कुरुंदवाड येथे गांधी बापूंचा स्वतंत्र प्रसाद द्यावा लागणार ! या अटी मान्य असतील तरच “जवळीक” असे, “बुडव्या”ने सांगितल्याची तालुक्यात सर्वत्र चर्चा आहे.
ही घटना “राजर्षी शाहू” महाराजांच्या ध्येय ,धोरण व लोकशाही तत्वाला बाधा आणणारी आहे, अशा चर्चेवरून केली जाणारी स्वतंत्र 50 लाखाची मागणी, सटाला तीन कोटीची मागणी, गांधी बापूंची खुमखुमीची भाषा, जमीन हडप, पोरग्याचा पैसे देण्यास विरोध असा कार्यक्रम ठरवून केला जात आहे की, परस्पर या बाबत तालुक्यात उलट-सुलट चर्चेला उधाण आल्याचे कळते.