राजर्षि शाहू आघाडी बद्दल नाराजी ? की,भाजपाच्या वरीष्ठानी दिला स्वतंत्र लढण्याचा कानमंत्र ?.
जयसिंगपूर/शिरोळ/कुरुंदवाड : चौकाचौकातून ….
शिरोळ तालुक्यात नगरपरिषद, जि.प.,प.स. व ग्रा.प.च्या कार्यकालात राजर्षी शाहू आघाडी कडून झालेल्या कामकाजाबाबतीत मतदार नागरिक यांच्यात तीव्र नाराजी आहे. अनेक ठिकाणी रस्ते न करता परस्पर बिले काढली आहेत?,कचरा ठेक्यात संगणमताने कोट्यावधीचा घोटाळा केला आहे?, घरपट्टी पाणीपट्टी परस्पर गायब करण्यात आली आहे?, बनावट पावती बुक छापून नगरपरिषदेचा महसूल गोळा केला आहे?.
लेखापरीक्षणात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन स्वतःच्या जमिनी शाबूत ठेवून असंबंध शेतकऱ्यांच्या जमिनीवर विकास आराखड्याचे आरक्षण टाकल्याच्या घटना अजूनही ताज्या आहेत. अबाउ टेंडर काढून ठेकेदारांना हाताशी धरून 40% मार्जिन ठेवून रस्ते गटारींची निकृष्ट कामे केली आहेत, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली नाही, पाणीपुरवठा, भुयारी गटर कामकाजात भागीदारी ठेवल्याचा आरोप आहे?.
भाजपाची राज्यात आणि देशात मोठी ताकद असताना राजर्षि शाहू आघाडीमुळे उमेदवारांना बसणारा फटका पक्षाला अशोभनीय आहे. त्यामुळे भाजपाचे सर्व उमेदवार कमळ चिन्हावर स्वतंत्रपणे किंवा भाजपाच्या ताराराणी आघाडीकडून निवडणुकीत उतरवावेत. असा कानमंत्र भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिल्याची चर्चा शिरोळ तालुक्यात कानाकोपऱ्यात रंगली आहे.
वरिष्ठांचा आदेश प्रमाण मानून शिरोळ तालुक्यातील भाजपा मोरक्यांनी निवडणूक रिंगणात उतरून राजर्षि शाहू आघाडी विरोधात असलेल्या पॅनलशी दोन हात करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समजून येत आहे. भाजपा मोरक्यांनी ठेवलेले टार्गेटचा विचारात करता भाजपाला, राजर्षी शाहू आघाडीची तालुक्यात ताकद कमी झाल्याचा संदेश तरी द्यायचा नसेल ना ? असे तर्क-वितर्क लढवले जात असल्याचे समजते.
दरम्यान, शिरोळ तालुक्यातील शहर व वेगवेगळ्या गावातील चौकात चौकात होणाऱ्या चर्चेनुसार भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी युतीसाठी आम. यड्रावकर यांच्या समोर लोटांगण घातल्याची उलट-सुलट चर्चा आहे. युती करण्याविषयी शुक्रवारी झालेल्या बैठकीत आम. यड्रावकर यांनी भाजपाला फटकारल्याचे समजते. परंतु, भाजपा आणि शाहू आघाडीमध्ये झालेल्या बैठकीच्या वृत्ताला कोणीही अधिकृत दुजोरा द्यायला तयार नाही.