गणपतराव पाटील साहेब, मतदारांच्या मनातील शंका दुर करा.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
नुकतेच आम.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी एका पत्रकार बैठकीत राजर्षी शाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली आहे. शाहू कडून घोषित करण्यात आलेले उमेदवार दत्त साखरशी संबंधित असल्याचे समजते. त्यामुळे माजी चेअरमन व संचालक गणपतराव पाटील यांनी हा काय प्रकार आहे ? याचा खुलासा करावा.अशी मागणी मतदारातून होत असल्याचे समजते.
राजर्षी शाहूच्या घोषणेचे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार कारखाना समर्थक-शेतकरी-कामगार-सभासद, काँग्रेस, स्वाभिमानी, शिवसेना व भाजपा कार्यकर्ते-समर्थक-मतदार-नागरीक यांनी मार्ग मोकळा झाल्याचा शब्द प्रयोग करून सूटकेचा नि:श्वास सोडल्याचे चर्चेत आहे.
निवडणूक आयोग आणि लोकशाहीचे तत्व याचे समीकरण घालून शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड मधील इच्छुक उमेदवारांनी, वेगवेगळ्या आघाडीसमोर डाव टाकले आहेत. यात डोळ्यावर पट्टी बांधलेल्या आघाडीने, टक्केवारी व भ्रष्टाचारात पारंगत असलेला तसेच राजकीय अल्पज्ञान याबरोबर कुरघोड्या करण्यात माहीर असलेल्यांवर विश्वास ठेवून निर्णय घेतल्याचे समजते. अंध आघाडीच्या निर्णयामुळे शहरातील मतदारांच्या डोक्यावरील ओझे कमी झाल्याची भावना खुद्द मतदार व्यक्त करीत असल्याचे समजून येत आहे.
शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अंध असणाऱ्या आघाडी, पॅनेल ,पक्ष यांनी निवड केलेल्या उमेदवारांना उद्देशून “सुंठीवाचून खोकला गेला” असे टोमणे मतदार लघावत असल्याची चर्चा आहे. खरंतर उमेदवारी जाहीर करणाऱ्या आघाडी, पॅनेल, पक्ष यांच्या धोरणांचा, विरोधी आणि तोंडावर बोट ठेवलेल्या पॅनेलला मोठा फायदा होत असल्याची चर्चा आहे. “आंधळा मागतोय एक डोळा, अन् देव देतोय दोन डोळे”, अशी चर्चा शिरोळ शहरात रंगली असल्याचे समजते.