“निष्पक्ष” रहाण्याची “बाबां”चा भूमिका म्हणजे, “सत्या”ची पाठराखण व “असत्या”ला मुठमाती.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीचे “किंग मेकर” असणारे “बाबा उर्फ प्रताप पाटील” यांनी 2025 च्या शिरोळ नगरपरिषद निवडणुकीमध्ये आघाडीबरोबर “काडीमोड” घेतल्याचे वृत्त समजून येत आहे. “भ्रष्टाचार” आणि “अन्याय” विरुद्ध लढणारे, “टक्केवारी”चे समर्थन न करणारे, “खोटे”पणा सहन न करणारे, दिलेल्या “शब्दा”शी फारकत न घेणारे, घेतलेल्या “निर्णया”पासून मागे न हटणारे व्यक्तिमत्व म्हणून “बाबा” यांची, शिरोळ पंचक्रोशीत ओळख आहे, निश्चितच “राजर्षी शाहू आघाडी” चे “पक्षपाती” धोरण त्यांना रूजले नसल्याने “बाबा” यांनी “निष्पक्ष” राहण्याची भूमिका घेतली असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
“बाबा” यांना शिरोळ शहरातील “समुदाय”मध्ये मानाचे स्थान आहे. त्याचबरोबर शहरात ही त्यांची, पारदर्शी, स्वच्छ विना भ्रष्टाचारी अन्यायाविरुद्ध लढणारी अशी “छबी” आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य चौकांपासून शेवटच्या टोकापर्यंत आणि समुदायांमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. याचाच फायदा सन 2019 च्या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीला झाला होता. आता बाबा यांनी स्वतःच निष्पक्ष राहण्याचे धोरण ठेवल्यामुळे या निवडणुकीतील सत्तेचे समीकरण बदलणार असल्याचा विश्वास शहरातील नागरिक व्यक्त करीत असल्याचे समजते.
“बाबा पाटील” यांच्या कार्यकर्तुत्वाला मतदार ,नागरिकांचा “फुल्ल सपोर्ट” असल्यामुळे ते कोणतीही निवडणूक कोणत्याही बाजूने झुकवू शकतात, एवढी त्यांच्यामध्ये क्षमता आहे. बाबांच्या “निष्पक्ष” भुमिकेमुळे झालेली “पिछेहाट” पडद्यामागे लपवून ठेवत त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. असा केविलवाणा “आत्मविश्वास” साहेब, मालकांना दिला जात आहे. म्हणे, शिरोळ मध्ये बाबांचं काय आहे ? म्हणे, मी आहे, म्हणून बाबा होते ? म्हणे, मी बाबांना वगळल्यामुळे ते आता शून्य झाले आहेत ? असा गैरसमज करून दिला जात असल्याची चर्चा आहे.