मागचा अनुभव, थेट उमेदवारांना निधी देणार, “शोक” नको, पदरच्या पैशाने निवडणूक लढवा. सक्त सूचना आणि इशारा.
शिरोळ/जयसिंगपूर/कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ., जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकांच्या निवडणुकीतील स्थानिक आघाडी प्रमुख म्हणून धुरा सांभाळणाऱ्यांनी, आपल्या आघाडी प्रमुख व पक्ष प्रमुखांकडे मागणी केलेल्या निवडणूक निधीवरून “त्या” दोघा “सोम्या-गोम्या”ला चांगलेच फटकारले असल्याची चर्चा निवडणूक निमित्ताने सुरू झाली आहे.
गतनिवडणुकीत उमेदवार खर्चा करिता दोन कोटी दिले होते. त्यापैकी प्रति उमेदवाराकडून पाच लाख परत घेऊन, एक कोटी गोळा करून तिजोरी भरली. “सोम्याभाऊ” तुम्ही आघाडीला “भीम” टोला लघावत “बहाद्दुरी” दाखवली आहे. पूर्वानुभव लक्षात घेता आता निवडणूक खर्च हातात दिला जाणार नाही. थेट उमेदवाराला दिला जाईल. फक्त याद्या पाठवा आणि उमेदवारांबरोबर प्रचार कामाला लागा.अशी सक्त सूचना त्या “टग्या”ला, साहेबांनी दिली असल्याचे समजते.
पक्षाची इज्जत असलेल्या चिन्हावर निवडणूक न लढणाऱ्या उमेदवाराला फंड दिला जात नाही. ज्या आघाडीकडून निवडणूक लढवत आहात, त्यांच्याकडून फंड घेऊन तो खर्च करावा. पक्षाचे “गांधी”बापू” इतके स्वस्त नाहीत. “गोम्याभाऊ” तुम्हाला राज्याचे संविधानिक पद दिले आहे, निधी दिला आहे, भरपूर “टक्केवारी” मिळवलेली आहे, सहकार उद्योगातून, सरकार व सभासदांचा केसाने गळा कापला आहे, अशा कार्यकर्तृत्वामुळे पक्षाला भविष्यात “शोक” करावा लागेल. त्यामुळे खिशातील पैसे घालून निवडणूक लढवा असा स्पष्ट इशारा वरच्या दादांनी दिल्याचे समजते.
शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत या सोम्या-गोम्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अंतर्गत युती केली आहे. यासाठी एका “टग्या”ने गांधी “बापूं”चे छायाचित्र असलेले “पंचवीस लाख” कागद अगोदरच खिशात घातले आहेत. यापुढे जाऊन “32 हजार बुडव्या”ला साजेशी अशी खेळी करून “दादा” चा “विश्वास” हिरावून घेवून त्याला डॉक्टरांच्या अति दक्षता विभागात कसा पाठवायचा ? सुताची दोरी करून खाटला कसा बांधून ठेवायचा ?, कशी ट्रीटमेंट करायची ? याचे करेक्ट नियोजन केल्याची मतदारात चर्चा आहे.