विरोधी गटाची प्रसिद्धीपत्रके, बातम्या, दत्त कारखान्यावरून प्रसिद्ध होणार ?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषदेमध्ये यादव आणि विरोधी गटाचा नगराध्यक्ष पदाचा, कोणताही उमेदवार निवडून आला तर, तो कारखान्याचा असेल ? अशा दुहेरी राजकीय खेळी बरोबर विरोधाची धार कमी होण्यासाठी ?, कारखान्याचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांनी दुधारी चाल केल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कारखान्याच्या त्या कर्मचाऱ्यांने, सदरची उमेदवारी कारखान्याची आहे, असा प्रचार केला तर, यादव पॅनेलच्या विजयी उमेदवाराचे मताधिक्य कमी होणार आहे. आणि तो घात ठरणार असल्याचे मतदार बोलत आहेत.
नगरपरिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवारांची फोडाफोडी, उष्ट्या उमेदवारांची निवड, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबरोबर सौदेबाजी अशा अनेक घडामोडी घडताहेत. त्यातच विरोधी गटाच्या दैनंदिन घडामोडीच्या बातम्या, श्री दत्त साखर कारखान्यावरून प्रसिद्ध होणार असे चित्र निर्माण झाल्याची चर्चा होत असल्याचे ऐकायला मिळत आहे.
साखर कारखान्याचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांनी यादव पॅनेलला उघड उघड पांठिंबा जाहिर केला आहे.पण, शेतकरी सभासदांच्या कारखान्यात विश्वस्त म्हणून जबाबदारी पार पाडणारे उद्यान पंडित पाटील यांचे निकटवर्तीय कर्मचारी विरोधी गटातून महत्वाच्या पदासाठी निवडणुक लढवित असल्याचे प्रकर्षाने मतदारांच्या समोर आले आहे. त्यामुळे मतदारांचा संभ्रम वाढला आहे. सदरचा संभ्रम दूर करण्यासाठी पाटील यांनी पुढे यावे.अशी मागणी नागरिक, मतदारातून होत असल्याचे समजते.
पृथ्वीराजसिंह यादव यांच्या पॅनेलला उघड पाठिंबा आणि विरोधी गटाकडून महत्त्वाच्या पदासाठी कारखाना कर्मचाऱ्याला उमेदवारी हा राजकीय डाव ?, ठरवून तर केला नसेल काय ? असा संशय मतदारांना येत असल्याचे समजते. अशा दुहेरी भूमिकेच्या संशयामुळे मतदार संभ्रमात पडले आहेत. भविष्यातील राजकारण व विश्वासार्हता टिकवण्याच्या दृष्टीने, यादव की, विरोधी, यापैकी कोणत्या उमेदवाराला पाठबळ द्यावयाचे. याचा जाहीर खुलासा मतदारांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.