पाटील यांच्या संधिग्ध भुमिकेमुळे मतदारांत संभ्रम आणि संताप
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
दत्त साखर कारखान्याचे सर्वेसर्वा, कॉग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांचा राजर्षी शाहू आघाडीच्या महत्वाच्या पदाच्या उमेदवाराला पाठींबा की, आम. सतेज उर्फ बंटी पाटील व पृथ्वीराजसिंह यादव यांच्या शिव शाहू, यादव पॅनेलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला ? याविषयी मतदारात कायम संभ्रम आहे.
शाहू आघाडीचा उमेदवार हा दत्त कारखान्याचा कर्मचारी असून गणपतरावांचा निकटवर्तीय आहे, हा उमेदवार पाटील यांनीच दिल्याची सर्व पातळीवर संशयात्मक चर्चा आहे. मात्र, याविषयी कॉग्रेस नेते गणपतराव पाटील यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवण्याचे कृत्य केले आहे. त्यामुळे पाटील यांचे हे राजकीय कृत्य यादव पॅनेलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला दगाफटका करण्यासाठी असावे, असे मतदार नागरिक बोलत असल्याचे समजते.
कारखाना समर्थक, कार्यकर्त, पदाधिकारी, कामगार अशी मंडळी यादव पॅनलच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतदारसंघात उतरवले आहेत, असे सांगून कॉंग्रेस नेते गणपतराव पाटील हे स्वतःवरची जबाबदारी टाळण्याची शक्यता आहे ? शाहुच्या उमेदवाराला छुपा पाठींबा देण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.अशीही चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीचा धर्म पाळत असताना पाटील यांनी कोणतीतरी एक बाजू मतदारासमोर आणावी. अशीही मते व्यक्त होत असल्याचे समजते.
निश्चितच, कॉग्रेस नेते गणपतराव पाटील यांचे दुहेरी धोरण असल्यामुळे त्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे का ?. परंतु, या राजकीय कृत्याचा त्यांना विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये नक्कीच फटका बसण्याची शक्यता असून याचा त्रास आम. सतेज पाटील यांना होणार आहे, त्यामुळे निर्णायक भुमिका मतदारांसमोर मांडणे महत्वाचे आहे. मतदारातील संभ्रम दूर करावा. अशी मतदारांची भावना आहे. अन्यथा…….