“32 हजार बुडव्या”मुळे लोक दारात आले नाहीत तर, दारात जाण्याची नामुष्की आली.
“जातीयवादी खेळी”, “सर्व शासकीय अधिकारी” आणि “32 हजार बुडव्या” सारख्यांच्या मदतीने अनेकांना अडचणीत आणण्याचे प्रकार करून यड्रावकरांनी आपली राजकीय पकड मजबूत करण्याचा कलेला प्रयत्न अंगलट येणार ? अशी चर्चा आहे.विशेषतः बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना साम,दाम, दंड, भेद ही नीती वापरून हतबल करणे, यामुळे सर्व सामान्य जनतेत यड्रावकरांच्या राजकारणाविषयी चीड निर्माण झाल्याचे समजते. लोक बोलत नाहीत. पण, मतदारांनी चमत्कार घडवून दाखवला.हे यड्रावकराना नगरपािलका निकालानंतरच कळेल असे लोक बोलताहेत.
महायुतीचा पैसा वापरून यड्रावकरांनी,भाजपा फोडला व ठाकरेंची शिवसेना पळवली.
अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या यड्रावकरांनी संधी साधून उध्दव ठाकरे सरकारमधे प्रवेश मिळवला. हा प्रवेश देखील वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर उध्दव ठाकरे यांचे सरकार पडतंय असं दिसताच उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून ? ते गुहाटीला जावून एकनाथ शिंदे यांना सामिल झाले. या विरोधात शिरोळ तालुक्यातील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता.आता त्याच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ठराविक कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यांना पाठिंबा दिलेला पाहून तालुक्यातील जनता अचंबित झाली आहे.
अर्थपूर्ण घडामोडीची जाणिव, मतदार समजायचं ते समजून घेत आहेत.
यड्रावकरांनी जयसिंगपूर शहरातील भाजपाच्या कार्यकर्त्याना अर्थपूर्ण वाटाघाटीतून गळाला लावल्याची चर्चा आहे. ठराविक जण सर्व काही विसरून यड्रावकरांच्या दावणीला जाताहेत. देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांचा डंका वाजवणाऱ्या पक्षाचे लोक राजेंद्र पाटील यांचा झेंडा खांद्यावरून मिरवताहेत. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे तालुक्यातील बहुसंख्य मुस्लिम मतदार असल्याचा भाजपा गोटात गैरसमज आहे. हा समुदाय भाजपाला मतदान करीत नाहीत. त्यामुळे थेट कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यापेक्षा राजर्षी शाहू आघाडीतून निवडून यायचे असा आडाखा शिरोळ,जयसिंगपूर आणि कुरूंदवाड शहरातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बांधला आहे. परंतू अशा संधीसाधू भूमिकेला तीनही शहरातील नागरीक, मतदार स्विकारायला तयार नाहीत.
शिरोळ तालुक्यात हिंदुत्ववादी विचारांची धुरा मराठा समाजाने सांभाळली.
यड्रावकरांनी 2014 च्या पराभवानंतर सातत्याने प्रयत्न करून मराठा समाजातील प्रमुख नेत्यांमधे फूट पाडली. यड्रावकरांनी शिरोळ तालुक्यातील जातींचा सूक्ष्म अभ्यास केला. तालुक्यातील राजकारण मराठा, जैन आणि लिंगायत या तीन प्रमुख जाती भोवती फिरत असते. तालुक्यात मराठा समाज बहुसंख्य आहे. पण, विखुरलेला आहे. ज्यावेळी हा समाज एकत्र येतो त्यावेळी हमखास विजयी होतो असे पूर्वी दोनदा घडले आहे. विशेषतः दिनकरराव यादव आणि उल्हास पाटील यांच्या निवडणुकीत याचे प्रत्यंतर आले होते.
तालुक्यातील राजकीय नेते, बहुसंख्य मराठा समाजाचा धसका घेवूनच आपले राजकीय डावपेच आखत असतात. जैन, लिंगायत आणि मराठा समाजातील उमेदवार स्वतंत्रपणे लढतात तेंव्हा मराठा समाजाचा उमेदवार हमखास विजयी होतो. हे उल्हास पाटील यांच्या निवडणुकीत दिसून आले होते. परवाच्या निवडणुकीत उल्हास पाटील यांना उभे करून मराठा समाजातील मतात फूट पाडण्यात राजेंद्र पाटील यड्रावकर यांचाच हात होता, असे तालुक्यात आता उघडपणे बोलले जात आहे. उल्हास पाटील नसते तर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पराभव झाला असता अशी स्थिती होती.कारण मराठा आणि लिंगायत हे समीकरण यड्रावकर यांना भारी पडले असते.
संजय पाटील यांच्यासाठी तयार केला जातोय प्लॅटफार्म
पुढील निवडणुकीत बंधू संजय पाटील यड्रावकर यांना आमदार करायचे आहे.त्यासाठी त्यांनी तालुक्यातील वेगवेगळे राजकीय पक्ष आणि संघटना खिळखिळे करायला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सावकार मादनाईक यांना फोडून जैन व्होट बँक मजबूत केली. दुसरी चाल अशी रचली की, सावकार मादनाईक यांना भारतीय जनता पक्षात पाठवले.आता अचानक सावकार मादनाईक यांना माघारी बोलावून व्होट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.तर उल्हास पाटील यांना सोबत घेवून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे.
कुरूंदवाड नगरपालिका निवडणुकीत असाच प्रयोग करून भाजपाचे रामभाऊ डांगे यांना पक्षापासून दूर केले आहे.त्यांच्या सूनबाईना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अशा रीतीने त्यांनी तालुक्यात भारतीय जनता पक्ष खिळखिळा करून टाकला आहे. गेली काही वर्षे गुरूदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आगामी काळात माधवराव घाटगे आपल्याला वरचढ होतील या भीतीने त्यांनी मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांना फोडण्याचा सपाटा लावला आहे.दुर्देवाने मराठा समाजातील काही नेते याला बळी पडताना दिसत आहेत. पण कार्यकर्ते फोडले तरी मराठा समाज त्यांच्या बरोबर जाईलच याची शाश्वती नाही.
यड्रावकरांना, नगरपालिका निवडणुक तितकीशी सोपी राहिली नाही.
टक्केवारीतून सगळ्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना अर्थपूर्ण वाटाघाटीचा गळ लाऊन दावणीला बांधण्याचा सपाटा यड्रावकरांनी लावला आहे.परंतू, विरोधातही तितकीच मजबूत फळी उभी असल्याने नगरपालिका निवडणूक त्यांना तितकीशी सोपी राहिली नाही. त्यांनी जातीय समीकरणे उभी केली असली तरी त्या समीकरणाला छेद देणारे उलटे समीकरणही उभी करण्यात आले आहे. भलतेच साहस करून त्यांनी आपल्यावर फार मोठे संकट ओढावून घेतले आहे.विशेषत: तालुक्यातील भाजपा खिळखिळा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाकडे वरिष्ठ दुर्लक्ष करेल असे वाटत नाही.