50 घेणारा तो टग्या “हाक्या” कोण ? धोक्याची घंटा वाजू लागल्याने जिभेवरील नियंत्रण सुटले ?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
विशिष्ट दोन समुदायाची व्होट बँक पदरात पडावी म्हणून भाजपाने ताराराणीचा प्रस्ताव पुढे केला.
भाजपाने मेळावा घेऊन जे जाहीर केले ते शेवटपर्यंत केलेच नाही.भाजप आणि राजर्षी शाहू आघाडी हे दोघे वेगवेगळे भाग नाहीत, एकच आहेत. हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच एकत्र येण्याचा प्रयत्न करीत होते, अशी मतदारांतून भावना व्यक्त होत आहे. भाजपाला कमळ चिन्हाची भीती होती. आणि राजर्षी शाहू आघाडीला भाजपाचा नगराध्यक्ष नको होता. याशिवाय युती झाली तर त्या दोन समुदायाची व्होट बँक शाहू आघाडीला मिळणार नाही. याची खात्री संबंधितांनी करून घेतल्याचे समजते.
ताराराणी आघाडी हे एक भाजपाचेच अंग असल्यामुळे प्रमुखांनी मतदारांच्या तुलनेत किमान पराभवाची टक्केवारी कशी कमी करता येईल यासाठी ताराराणी आघाडीला पुढे केले. परंतु, कोंबडा डाळला तर सूर्य उगवणार नाही, मतदार अंधारात राहतील अशी केलेली रणनीती आता भाजपाच्याच अंगलट येताना दिसत असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. दरम्यान, शिरोळ निवडणुकीमध्ये तिघेजण कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत.
आम.डॉ.अशोकराव माने यांनी खालच्या पट्टीत, “त्याची”, “का बाबा” असा एकेरी शब्द प्रयोग करून आम. यड्रावकरांची चार चौघात ?.
एक ऐकून घ्या, खासदार साहेबांनी आणि माधवराव घाडगे साहेबांनी कोल्हापूर मध्ये मीटिंग घेतली. त्यांची होती आम्ही सगळेजण होतो. काय ठरलं ? “त्याची” शाहू आघाडी आणि आमची ताराराणी आघाडी, दोघांनी सेम सेम निवडणूक लढवायची या तालुक्यामध्ये तिन्ही नगरपरिषदेमध्ये निवडणूक लढवायची. त्यांनी मान्य केलं आणि दुसऱ्या वेळी, नाकारलं. आमचीच फक्त शाहु आघाडी राहिली पाहिजे, तिन्ही ठिकाणी आमचेच उमेदवार, त्यांच्या आघाडी मार्फत निवडले पाहिजेत. निवडणूक लढवली पाहिजे. हे का बाबा ?
तुमची शाहू आघाडी आणि आमची ताराराणी आघाडी एकत्रित निवडणूक लढवली असती तर, हा विषयच आला नसता. त्यांना फक्त त्यांचीच शाहू आघाडी पाहिजे बाकी कोण नको म्हणून हे सगळं घडल, तुम्हाला सांगतो. त्यांचा अट्टाहास फक्त शाहू आघाडीच होता आमचा दोन्ही पण होता शाहू आघाडीचा पण होता ताराराणी आघाडीचा पण होता पण त्यांनी तो मान्य केला नाही म्हणून स्वतंत्र लढवण्याची पाळी आली.
आम. अशोक बापूंना एवढं बळ आलं कुठून ? आमदारकी, भाजपा की, जनसुराज्य ?
आम. अशोकराव माने यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत वस्तुस्थिती कथन केली असली तरी, त्यांनी जी भाषा वापरली, हातवारे केले. त्यावरून त्यांच्या मनात आम. यड्रावकरांबद्दल किती द्वेष आहे, हे दिसत होते. बोलताना त्यांच्यात दहा हत्तीचं बळ आल्याची जाणीव होत होती, पण, युती करताना ते स्वतः भाजपा चिन्हावर लढायला तयार नव्हते हे सांगायला विसरले, त्या काळात सुहा जमाने नामक व्यक्ती जयसिंगपूरात रिवाजाप्रमाणे 3 आणि जादा 1 साठी किती धडपड करीत होता, हे सुध्दा सांगायला विसरल्याचे लोक बोलत आहेत. ही ताकद आमदारकी, भाजपा, जनसुराज्यमुळेच निर्माण होते.अशी चर्चा रात्री उशिरापर्यंत शहरात रंगली होती.
आम. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आम. अशोकराव मानेंचा नाद करू नये ?.
आम. माने बापूंनी, युती फिसकटण्यापूर्वी यड्रावकरांच्या आघाडी “हाक्या” बरोबर 50 चा सौदा करून शह दिल्याची चर्चा आहे. त्यानंतर एकेरी शब्द प्रयोग करून संविधानिक पदावरील व्यक्तीला चारचौघात फटकारले ?. यापूर्वी स्नुषा नीता माने यांना नगराध्यक्षपदावर बसवून डॉ. माने बापूंनी आपली ताकद दाखवली होती. आता, लागणार नाही तरीसुद्धा त्या “टग्या”ला सोबत घेऊन, बापू आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे आम. यड्रावकर यांनी आम. मानेंच्या पुढे जाऊन, कुवती पेक्षा मोठा घास घेण्याचा प्रयत्न करू नये.
आम. यड्रावकर बंधूंनी, आम.बापूंच्या पदराखाली राहूनच शिरोळची निवडणूक लढवणे शहाणपणाचे ठरणारे आहे, आम.बापूंची दोन्ही तालुक्या बरोबर महाराष्ट्रात मोठी ताकद असल्याची वस्तुस्थिती आहे , शिवाय जनसुराज्य आणि भाजपामध्ये मोठे वजन आहे म्हणे, त्यामुळे यदा कदाचित आमदार यड्रावकर केव्हाही चितपट होऊ शकतात, अशी चर्चा असून आम. माने बापूंना विरोध करणे महागात पडू शकते.असे मतदार बोलताहेत.