खाजगी प्रॉपर्टीत जीव अडकलाय, एक कोटीचे बांधकाम ? नाड्या आवळल्याची तुफान चर्चा !
जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
पोपटाचा जीव नगरपरिषदेमध्ये अडकलाय, सांगलीत कोणा दारुड्याच्या नावावर कोण एक कोटीचे बांधकाम करतय ?
जयसिंगपूर नगरपालिका ही पब्लिक प्रॉपर्टी आहे,” पण, गेल्या काही वर्षापासून ती प्रॉपर्टी खाजगी मालकीची बनली आहे, या प्रॉपर्टीवर पाच लोकांचे कुटुंब आणि खंडाळा, लोणावळा, माथेरान येथे ऐशारामी चालत असल्याची जयसिंगपूर शहरात चर्चा आहे, आता ही प्रॉपर्टी सोडवून घेण्याची जबाबदारी शहरातील नागरिक व मतदारांची आहे, सध्या आम. सतेज पाटील राजू शेट्टी, माधवराव घाटगे आणि गणपतराव पाटील या चौघांनी मोट बांधून, हडप केलेली प्रॉपर्टी, शहर वाशीयांना परत मिळवून देण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करीत आहेत.
टक्केवारीच्या विळख्यात अडकलेल्या नगरपरिषदेचा जीव घुटमळत आहे, आणि “चोच” लाल असणाऱ्या पोपटाचा जीव नगरपरिषदेतील त्या खुर्चीत अडकला असल्याचे लोक बोलताहेत. ठराविक व्यक्तींच्या इशाऱ्यावर नगरपरिषदेचे काम चालते. त्यातल्या एका प्रमुख पोपटाने नगरपरिषदेतील टक्केवारीतून “गव” आळी काकांच्या नावावर सांगली येथे एक कोटी रुपयांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू करून तो “मस्त” बंगला “आणि”ला दिला जाणार असल्याची जयसिंगपूर शहरात चर्चा आहे.
अशी धास्ती असलीच पाहिजे, “32 हजार” बुडव्या”च्या संगतीचे मोल किती याचे उत्तर लकरच !
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच झालेल्या छाननी प्रक्रिया दरम्यान, शिरोळमध्ये राजर्षी शाहू आघाडीने “शिव शाहू यादव पॅनेल”च्या उमेदवारावर आक्षेप नोंदवला. तर, जयसिंगपूर मध्ये राजर्षी शाहू आघाडीनेच शिरोळ तालुका विकास आघाडीच्या उमेदवारावर आक्षेप घेतला. यात दोन्ही घटनांवर प्रकाशझोत टाकला असता, शिरोळ मध्ये पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची आणि जयसिंगपूर मधील राजू शेट्टी आणि माधवराव घाटगे यांच्या “शिरोळ तालुका विकास” आघाडीची यड्रावकरांनी धास्ती घेतल्याची दिसून येत असल्याची चर्चा आहे.
जयसिंगपूरमध्ये तात्यासो, तात्यासाहेब आणि शामराव, शामगोंडा यावरून नोंदवलेल्या आक्षेपावेळी याला का आत घेतला ? आणि त्याला पण, बाहेर काढा ? अशी स्वप्निल व संजय यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर अक्षेपाचा विषय मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचला. पाटील यांनी संबंधितांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून मुळा मोडला. शाहूचा शिरोळातील आक्षेप निवडणुक अधिकाऱ्यांनी थेट उडवून लावला. जयसिंगपूर आणि शिरोळ येथील दोन्ही आक्षेपातून डाव साधला नसल्यामुळे शाहूचा पेच कसा वाढलाय याचा “रंग” उपस्थित समर्थकांच्या चेहऱ्यावर उठूटन दिसून येत होता, अशी चर्चा होती.
भाजपाने नाड्या आवळल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीचा धर्म पाळण्याचे केले आदेश.
राजर्षी शाहू आघाडी ही शिरोळ तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे उपअंग असल्याचा आरसा पुढे करण्यात आला आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिवसेनेचे आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचे कट्टर समर्थक तर, उपमुख्यमंत्री शिंदे, हे भाजपा सत्तेतील एक घटक असल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. दरम्यान, भाजपाने कागल मध्ये मंत्री हसन मुश्रीफ, सांगोल्यामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांची गोची केली. तशीच गोची आम. यड्रावकर यांची केल्याची चर्चा आहे. पर्यायाने शिरोळ तालुका विकास आघाडीला मोठी संधी प्राप्त झाल्याचे समजते.
राजू शेट्टी, गणपतराव पाटील, माधवराव घाटगे, राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी एकत्रित येऊन निवडणुकीबाबतची रणनीती धोरण स्पष्ट केले आहे हे धोरण केवळ एका नगरपरिषदेत पुरते मर्यादित राहिले नसून, भाजपाने शक्य होईल त्या ठिकाणी शिंदे गटाच्या नाड्या आवळल्या आहेत. त्यामुळे जयसिंगपूरसाठी भाजपाचे वेगळे धोरण नाही. हे मतदारांच्या समोर असल्याची चर्चा आहे.