“एबी” फॉर्मचा 10 लाख रुपयाला सौदा ? “बाबा” तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है !
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
उमेदवारीला एबी फॉर्म पाहिजे तर, 10 लाख रुपये द्यायचे आणि माझ्या प्रभागात 25 लाख रुपये खर्च करावे लागतील.
नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या आदल्या रात्री प्रभागातील नगरसेवक पदाचा सौदा करण्यात आल्याची चर्चा आहे. तुला, निवडणूक लढवायची असेल आणि त्या उमेदवाराच्या आगोदर एबी फॉर्म पहिजे तर मला “अमरत्व” म्हणून “10 लाख” रुपये द्यावे लागतील, तसेच माझ्या प्रभागात तुला “25 लाख” रुपये खर्च करावे लागतील अशी अट घालण्यात आली सदरची अट त्या उमेदवाराने पूर्ण केल्याची खळबळजनक माहिती गेल्या चार दिवसापासून चर्चेत आहे.
आता हा सौदा कोणी केला? कोण उमेदवार आहे? हे मतदार नागरिक जनतेला सांगण्याची गरज गरज नसल्याचे बोलले जात आहे. पण, ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर “उल्हासमय” वातावरणाला काडी लावत झालेला वाद-विवाद, शाब्दिक चकमक, हमरी-तुमरी, अरे-तुरेची भाषा याला साक्षीदार असल्याची मतदार बोलत आहेत. उमेदवारी देण्यासाठी 10 लाख रुपयांचा सौदा होत असेल तर, यापूर्वी काय घडले असेल ? याचा विचार न केलेला बरा अशी शहरात चर्चा सुरू असल्याचे समजते.
बाबांनी लढाईच जिंकली, “शिवाजी” काकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत
तसे पाहिले तर, “बाबा” खुप नशीबवान असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. “शिवाजी” काकांनी निवडणूक रिंगणातून आपला अर्ज माघार घेत दाखवलेला दिलदारपणा बाबांना “गुलाल”ने अंघोळ घालणारा ठरला आहे. माझा प्रयत्न “शेवट”चा आहे, यानंतर मी “संन्यास” घेणार आहे, अशी “याचना” आता उपयोगाला पडेल असे कुठेच दिसून येत नसल्याची चर्चा आहे.
बाबांना शिरोळचे भिष्माचार्य म्हटले जाते, बाबांनी अनेक अन्याय, भ्रष्ट कारभार, हुकूमशाही पाहिली, सगळ उघड्या डोळ्यान पाहिल, पण, तोंडातून ब्र काढला नाही. प्रामाणिक राहून एकनिष्ठपणाची कास सोडली नाही. योग्य वेळ आत्यानंतर भात्यातून बाण काढून जनतेसमोर आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आणि या निवडणुकीत मतदार समुदायाला साक्ष ठेवत “ब्रम्हास्त्र” डागल्याचे मतदार बोलताहेत.
बाबा हा शब्द फक्त वडीलधाऱ्यांना शोभून दिसतो, आणि त्यात खूप मोठी ताकद आहे, याचा प्रत्यय या निवडणुकीत आला. शिवाजी काकांनी जे काही केले त्याची परतफेड या जीवनात तरी करणे शक्य नाही. अशी भावना त्या प्रभागातील समुदायातील मतदार व्यक्त करीत असल्याचे समजते.