शिरोळसाठी ज्यांचे योगदान नाही, ज्यानी शासनाच्या पैशाची लूट केली ? अशा उमेदवारांना मत मागण्याचा अधिकार नसल्याची चर्चा.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
योगदान बलिदानाची उतराई करण्यासाठी मतदार “योगिता कांबळे” यांना “नगराध्यक्ष” करणार !
शिव शाहू प्रणित यादव पॅनलच्या उमेदवार योगिता सतीश कांबळे यांचे शिरोळ नगरपरिषद स्थापनेमध्ये मोलाचे योगदान आणि सिंहाचा वाटा आहे, हे शिरोळ शहरातील एकाही मतदाराला नाकारता येणार नाही. 2017 मध्ये शिरोळ पंचायत समिती गणातून त्या निवडून आल्या होत्या. त्यांच्या राजीनाम्याशिवाय नगर परिषद स्थापना होणार नव्हती. पण, कांबळे यांनी अगदी मोठ्या मनाने शिरोळ शहराच्या विकासासाठी आपल्या पदाचे बलिदान दिले. पंचायत समिती माध्यमातून आलेला फंड त्यांनी नगरपरिषदेकडे वर्ग करून विकासाची कामे केली. सातत्याने जनसंपर्कात राहून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.
आपले राजकीय सामाजिक छबी कायम ठेवून त्यानी जनसेवा केली. म्हणूनच शिरोळातील प्रत्येक घरातील मतदारांनी योगिता कांबळे यांच्या योगदान, बलिदान, परिश्रमाची उतराई करण्यासाठी त्यांना भरभरून मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे प्रतिस्पर्धी उमेदवाराने किती जरी पैसा वाटला तरी मतदान हे योगिता कांबळे यांनाच देणार या भूमिकेशी मतदार ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिरोळातील मतदारांतून त्यांना मिळणारा प्रतिसाद हेच त्याचे खणखणीत उत्तर आहे. आणि निकालानंतर विरोधी प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा याचे कोडे नक्की उघडेल अशी मतदारसंघात चर्चा आहे.
सगळी पदे तुमच्याच घरात कशासाठी द्यायची? तुमच्याच भातावर वरण का?
एका बाजूला जे राजकारणात कधीही साधे ग्रामपंचायतीची सदस्य झाले नाहीत, शहर व गावासाठी कधीही बलिदान दिले नाही, त्याग नावाच्या शब्दाचा दुरान्वये सुद्धा कधी संबंध आला नाही, कोणतीही योगदान न देता कुटुंबाने आपली संपूर्ण हयात शासकीय तिजोरीवर डल्ला मारून पैसा गोळा करण्यासाठी घालवली अशा भाजपा-ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला विकास म्हणजे काय हे माहित आहे का ? शहरातील कुंटूबे, समस्या, गरीबी, बेघर, रस्ते, शुद्ध पाणी पुरवठा या संदर्भात कोणती माहिती आहे?, केवळ मिष्ठान्न दिलं म्हणून जनता भूलत नाही ? स्वतःच्या घरात आमदारकी, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, परत नगराध्यक्ष अशी पदे का हवी आहेत?, जनतेतून एखादा सर्वसामान्य व्यक्ती निवडून आणण्यासाठी प्रयत्न न करता सगळेच वरण स्वतःच्या भातावर कशासाठी? असा सवाल करून, पैशाच्या जिवावर शिरोळकरांना विकत घेवून त्यांच्या आत्मसन्माला डिवचण्याचा प्रयत्न करू नये अशी चर्चा शिरोळ शहरातील मतदार करीत असल्याचे समजते.
जनतेच्या पैशाची लूट होत असताना राजर्षी शाहू आघाडीने डोळे झाक केली?
दुसऱ्या बाजूला राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने शिरोळसाठी कोणते योगदान दिले आहे?. याचे एक उदाहरण जनतेसमोर ठेवावे?, स्थानिक स्वराज्य संस्था उभारणीत कोणते कार्य केले आहे?, म्हणून त्यांच्यासाठी जीव तोडून द्यायचा? ज्या आघाडीच्या माध्यमातून जनतेसमोर येत आहेत, त्या आघाडीच्या “हाक्या”नी जनतेला कसे लुटले? त्यात आघाडीचा किती खोलवर संबध होता?. लोकांचे “32 हजार” सुद्धा पुरले नाहीत. कचरा, पाणी, आरोग्य, शासनाची मोटार गाडी, कामगारांचा पगार, पीएफ़, महसुल मध्ये नजरेसमोर कोठ्यावधीचा ढपला पाडला? भ्रष्ट पैशातून कशा जमिनी ? मोक्याच्या ठिकाणी प्लॉट?, पर्यटन, ऐतिहासिक स्थळी जागा घेतली? याची आघाडीने कोणती दखल घेतली वा चौकशी केली? की, सशाला खळगा जामिन? याचे जनतेला उत्तर देवूनच अमेदवाराला मतदान मागायला पाठवावे असा संताप मतदार व्यक्त करीत असल्याचे समजते.
शहरातील एका नगराध्यक्ष उमेदवाराने पोस्ट, स्टोरी, रील व्हायरल करून सोशल मीडियातून पोकळ भबका निर्माण केल्याचे चित्र आहे. परंतु, मतदार संघात तशी परिस्थिती कुठेच दिसून येत नाही. त्या उमेदवाराला सोशल मीडियावर सुद्धा अल्प प्रतिसाद आहे, प्रत्यक्षात मतदारात प्रतिसाद नाही असे नागरिक, मतदार, तरुण, युवक वर्ग बोलत असल्याचे समजते.