पण, नेते धुर्त खेळी करीत असतील तर, मतदारांनी काय समजायच ?
शिरोळ/कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
गणपतराव पाटील ठरताहेत, शिव शाहू यादव पॅनेलचे “बुजगावणे”, स्वतःची निवडणूक असती तर, ते असे वागले असते काय?
सत्ता आणि खुर्ची, त्याचबरोबर आरोप होत असलेल्या टक्केवारीच्या पार्श्वभूमीवर आम. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नगरपरिषद मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या अस्तित्वासाठी मतदारांना हात जोडत आहेत. साथ द्या, विकास करतो असे आवाहन करीत असल्याची चर्चा आहे. परंतु, यादव पॅनेलचे खंदे समर्थक गणपतराव पाटील आणि राजू शेट्टी यांच्याकडून पॅनेलला भरघोस मतदान मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे कुठेही दिसून येत नाही. उलट दोन दिवसांपूर्वी गणपतराव पाटील यांनी या बोटावरची थुंकी त्या बोटावर कशी केली याचे जिवंत उदाहरण सर्वांना पाहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकीत गणपतराव पाटील यांची कशी धडपड सुरू होती?.
गणपतराव पाटील यांची दुटप्पी भूमिका पाहिली तर, निवडून येणारा नगराध्यक्ष कारखान्याचा असणार आहे. असा धूर्त हेतू ठेवून दोन्ही पॅनेलच्या खांद्यावर पाटील यांनी हात ठेवला असल्याचे मतदार बोलत आहेत. या धुर्त भूमिकेमुळे शिरोळ शहरातील मतदारांची प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही संभ्रमावस्था, नाराजी दूर करण्यासाठी पॅनलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव व सर्वेसर्वा राहुल यादव यांच्याकडून कोणताही प्रयत्न होताना दिसत नसल्याचा आरोप मतदार करीत आहेत. हीच निवडणूक गणपतराव पाटील यांच्या संबधीत आणि प्रतिष्ठेची असती तर ते यापूर्वीच निवडणूक रिंगणात उतरून कामाला लागले असते. असा ठाम विश्वास मतदार व्यक्त करीत असल्याचे समजते.
यड्रावकर साहेब, पुलाखालून भरपूर पाणी गेले आहे, आता उपयोग होणार नाही.
“32 हजार बुडव्या” मुळे मलीन झालेली आघाडीची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी आम. यड्रावकर जोरदार प्रयत्न करीत असल्याचे मतदार बोलत आहेत. परंतु, राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून जो टक्केवारीचा व अन्यायकारक कारभाराचा बाजार करण्यात आला त्याला आमदार यड्रावकरांनी कधीच रोखले नाही. त्यामुळे जनतेचे नुकसान व्हावे, त्यांच्यावर अन्याय व्हावा, यासाठी यड्रावकरांची मूकसंमती होती. म्हणूनच एवढे धाडस करण्यात आले असाही सवाल करून मतदारातून संताप केला जात असल्याचे समजते.
यंदाच्या निवडणुकीत मतदारांची मानसिकता बदलणे इतके सोपे राहिले नाही. कचरा, पाणी, दिवाबत्ती, आरोग्य, रस्ते, गटर ,नवीन नळ पाणी योजना, नवीन भुयारी गटार योजना, जमीन आरक्षण, टक्केवारी, भ्रष्टाचार अशी स्वच्छ पारदर्शी कारभार जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यामुळे प्रयत्नांना यश मिळेल अशी अपेक्षा यड्रावकरांनी सोडून द्यावी अशी मतदारात चर्चा असल्याचे समजते.
एखादा नेता स्वार्थ हेतू डोक्यात ठेवून निवडणूक हाताळत असेल तर, यादव गटाने अशा नेत्याला निवडणुकीपासून दूर करावे. जाहिराती मधून त्यांचा फोटो काढून टाकावा. ही रणनिती मतदारांचा संभ्रम आणि निराशा दूर करण्यास उपयुक्त ठरेल अशी भावना व संताप मतदार व्यक्त करीत असल्याची चर्चा आहे