सत्ता आणि खुर्चीसाठी पक्ष बदलणाऱ्या यड्रावकरांना, शहरवासीय “तलाक” देणार !
जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत टक्केवारी, ते चार रस्ते न करता कोट्यावधी रुपयांची बीले परस्पर काढून खिशात घालने, रस्त्यांचे पॅचेस न करता 18 कोटी रुपयांचा ढपला पाडणे, साडेतीन कोटीची जागा आठ कोटीला खरेदी करणे असे आरोप करून शिरोळ तालुका विकास आघाडीने निवडणुकीत रंग आणला आहे.तर, राजू शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहू आघाडीला सळो की, पळो करून सोडल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राजर्षी शाहू आघाडीने आपल्या पॅनेलच्या रचनेमध्ये मराठा उमेदवारांना चतुर्थ स्थान दिल्यामुळे जयसिंगपूर शहरातील मराठा आक्रमक होऊन राजर्षी शाहूचे पानिपत करण्याच्या तयारीत आहे. निवडणूक अनुषंगाने जयसिंगपूर शहरात “एक मराठा लाख मराठा” या बॅनरखाली मोट बांधण्याचे काम गतिमान करण्यात येत आहे मराठा मतदारांनी या निवडणुकीत एकत्रित येऊन पोपट मंडळींना घरी बसवण्याची तयारी केली असून त्या अनुषंगाने गोपनीय बैठकांचे सत्र सुरू करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
जयसिंगपूर शहरातील उद्योजक, व्यावसायिकांच्या सहानुभूतीचा फायदा घेऊन यड्रावकर बंधूंनी नगरपालिकेची पब्लिक प्रॉपर्टी खाजगी करून ठेवल्याचा आरोप होत आहे. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर जैन, गुजर, मारवाडी, सिंधी, राजस्थानी यासह अन्य समुदायाने सुध्दा एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी निर्णायक लढाईची तयारी केली आहे. या बाबी राजर्षी शाहू आघाडीला नक्कीच पायउतार करण्यासाठी पुरेशा ठरणार आहेत.
शिरोळ तालुका विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार “सुदर्शन कदम” यांच्यासाठी मराठा समाजाला जैन, गुजर, मारवाडी, बौद्ध आणि मुस्लिम समुदायाने पाठिंबा दर्शवल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. आतापर्यंत झालेल्या अन्यायकारक घटनांना जमिनीत गाढण्यासाठी जयसिंगपूर शहर एकवटले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ता बदलाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.