मतदारांनी दिले हत्तीचे बळ, शिवाजी काकांच्या माघारीमुळे त्याला आली कळ,
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
प्रभाग 9 मध्ये पद्मसिंह पाटील यांनाच गुलाल लागणार
शिरोळ नगरपरिषदेच्या प्रभाग 9 मधील उमेदवार लढतीमध्ये चुरस असल्याची इतर प्रभागात चर्चा सुरू आहे. परंतु ,प्रत्यक्षात प्रभागातील वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठता अवलोकली असता ही निवडणूक चुरशीची नसून एकतर्फी होणार यात शंका नसल्याची मते जाणकार व्यक्त करीत आहेत.
मतदार आणि त्यांची मानसिकता याविषयीचा अंदाज घेतला असता यादव पॅनेलचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांना उघड आणि छुपा असा दोन्ही प्रकारचा पाठिंबा मिळत आहे. भीष्माचार्य बाबा पाटील यांच्या रणनीतीने प्रभाग 9 मधील रंग बदलले आहेत. दरम्यान, शिवाजी काका यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे पद्मसिंह पाटील व बाबा पाटील यांना हत्तीचे बळ प्राप्त झाल्याचे मतदार बोलत आहेत.
प्रभाग 9 मधील संपूर्ण मतदार समुदायाने यंदाच्या निवडणुकीत भाकरी पालटण्याचा निर्णय पक्का केला असल्याचे समजून येत आहे. दरम्यान, मतदार समुदायाने वाड्या-वस्त्यावरचे दिवस निघून गेले आहेत, भेट ,चर्चा किंवा नमस्कार करायचा असेल तर थेट घराकडे यायचं अशी भूमिका घेतल्याचे चर्चेत आहे. मतदार समुदायाच्या या भूमिकेमुळे आता भाकरी पालटली जाणार या चर्चेला ताकद मिळत आहे.
“मुजरा” करायचा की, न्याय मिळवायचा, हे मतदारांनीच ठरवावे.
शिरोळ शहरातील नागरिकांनी सन 2019 पासून खूप काही वाईट पाहिले व अनुभवले आहे. आता अन्याय, भ्रष्टाचार ,टक्केवारी, बुडवा बुडवी अशी मालिका खंडीत करावीच लागणार आहे. त्यामुळे 2025 च्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये नागरिक, मतदारांनी कामासाठी अप्रतिष्ठित बुडव्यांच्या वाड्या-वस्त्यावर जाऊन मुजरा करायचा की, जनसेवेसाठी नगरपरिषदेमध्ये खुर्ची टाकून बसलेल्या यादव गटाच्या नगराध्यक्षकडे जायचं हे ठरवण्याची गरज आहे.
बुवाफन महाराज उरूस व जयंती मधील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा निधी प्रती वर्षे न चुकता गायब करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती अध्यक्षपदासाठी शहरात तेढ निर्माण करणे, 4 कोटी 58 लाखाचा घनकचरा खाऊन टाकला, ठेक्याकडील कामगारांना दिवसाढवळ्या लुटले, नवीन पाणी योजनेच्या ठेकेदाराला 2 कोटीचा गंडा, रस्ता उकरून गटारी आणि गटारी पाडून रस्ता, जन आरोग्य सेवेच्या नावाखाली स्वतःच्या कुटुंबाची आरोग्य सेवा, भुयारी गटारीतून सुमारे 25 कोटीची देणगी, पंढरपूर रोडला 35 एकर जमिनीची खरेदी, पन्हाळा किल्ल्याच्या खालील बाजूस 8 गुंठे प्लॉट, त्या 12 जणांना प्रत्येकी 19 लाख रुपये प्रमाणे घातलेला गंडा, शेणघान व घरकाम आणि स्वयंपाकासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वापर, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोंडवाडा गायब करणे,
नियमित विकास कामात ठेकेदारांशी संगनमत व 40 टक्यांनी वसुली, अबाऊ टेंडर, एका नारळीच्या झाडासाठी वसूल केलेले 83 हजार रुपये, सर्वसामान्य गोरगरिबांच्या शेत जमिनीवर आरक्षण, स्वतःकडील (शासनाने कसून खायला दिलेली) जमिनीवर आरक्षण नाही, पैसे बुडवणे, खोटा जबाब व खोटी कागदपत्रे करणे, नियमबाह्य स्विकृती देणे, घरफाळा वसुलीचे बनावट पावती बुक तयार करणे, सलग वर्षे बेकायदेशिर दुकानाला कचरा ठेका देणे, मनमानी कारभार, फुले, हार विक्रेत्याचे पैसे बुडवणे, शासकीय जागेवर बेकायदा दुकान गाळे काढून त्याच्या भाड्यातून उदरनिर्वाह चालवणे, न्यायालयीन स्थगिती गोरगरीबांची दुकाने पाडणे, इंदिरानगर उध्वस्त करण्यासाठी त्यावर आरक्षण टाकणे, यासह 100 पेक्षा अधिक, केलेले अन्याय, गैरकारभार, गैरव्यवहार नागरीक, मतदार माफ करणार काय ?