7 आणि 10 च्या तुलनेत वाटप होणार?, एसटीपी नाही पण, भुयारी गटर केली.
शिरोळ/जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
शिरोळकर “मतदार निधी”साठी स्वाभिमान गहाण ठेवणार नाहीत, यादव गटाच्या विजयाचा मार्ग सुखकारक करणार !
आघाडी, पॅनेल आणि पक्षाच्या उमेदवाराला मतदार, नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. निवडून येत नाही. याचा अंदाज घेऊन शिरोळातील त्या सोम्या-गोम्यांनी मतदारांना लाचार करून त्यांच्या लाचारीचा निधी देण्याचा प्लान तयार केल्याचे कळते.
निधी फेकून मतदारांचा स्वाभिमान, अस्तीत्व स्वतःकडे गहाण घेण्यासाठी प्रभागवार सर्व्हे सुरू केल्याची माहिती चर्चेत आहे. जयसिंगपूर मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी 5 आणि नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारासाठी प्रत्येकी 2.5-2.5 असा 10 चा पॅटर्न तयार करण्यात आला असल्याचे समजते.
शिरोळ व कुरुंदवाड मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी 3 आणि नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारासाठी प्रत्येकी 2-2 याप्रमाणे 7 च्या पॅटर्न वापरून मतदारांचा लोकशाही हक्क हिरावून घ्यायचा. त्यांना ओझ्याचे बैल करून, शेवटच्या दोन दिवसात खिचडा वाटप करायचा, असे सोम्या-गोम्पाचे बगलबच्चे सांगत असल्याची चर्चा आहे.
मोठ्या प्रमाणात मतदार निधी मिळणार अशी, आवाई उठवल्यामुळे, मतदार लालसेपोटी आपल्या मागे फिरतील, पदयात्रेत गर्दी होईल. प्रतिसादाचा भपका उठेल असा भुलभुलैया कार्यक्रम रचला आहे. पण, मतदार हुश्शार आहेत. निधी दिला तरी यादव आणि नाही दिला तरी यादवच असा ठाम निर्णय करून बसल्यामुळे सोम्या- गोम्याची गोची झाल्याची चर्चा आहे.
जयसिंगपूरमध्ये, पहिल्यांदा एसटीपी बांधकाम न करता, भूयारी गटारीचे काम कसे केले ?
जयसिंगपूरमधील जनतेने, नगरपरिषद प्रशासन कोणकोणती कामे शासकीय नियम अटीतून, कायदेशिर पध्दतीने करीत आहेत याकडे कधीच लक्ष दिले नाही.याचा फायदा उठवत त्या मंडळींनी नगरपरिषद हीखाजगी प्रॉपर्टी केल्याचा आरोप जाणकार करीत असल्याचे समजते. मतदानासाठी निधी दिलाय आता काय करतोय ते विचारायचं नाही. असा सुचक इशाराही देवून जनेतेच्या तोंडाला कायमची पट्टी लावल्यामुळे मतदारांना मिंदेपणात जगावे लागत असल्याची चर्चा आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार भुयारी गटर करण्यापूर्वी एसटापीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे.परंतू, नियम अटी व धोरणांना कोलदांडा दाखवत नियमबाह्य भुयारी गटरचे काम केले. या मागच्या कारणाला विरोधी मंडळींनी “टक्केवारी” असे अडनाव देवून त्याचे चालू निवडणुकीत बारसे घातल्याचे सर्वज्ञात आहे.
अंतर्गत भुयारी गटारीचे काम पुर्णत्वास आले आहे.परंतू, शहरात गटारीसाठी उकरला जाणाऱ्या रस्त्यावर पॅचवर्क करण्यासाठी शासनाने 18 कोटीचा निधीची तरतुद केल्याचे समजते पण, एकाही रस्त्यावर पॅचवर्क केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे 18 कोटीच्या निधी खर्ची पडला की, शिल्लक राहिला याबाबत संशय असल्याचे नागरीक बोलताहेत.