“पैसा लो, मत दो” पॅटर्न हद्दपार होणार, खेकटेखोरांच्या राजकीय हद्दपारीसाठी मतदार सज्ज
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
लवकरच बातमी वाचा : एका बाळी माळू नावाच्या भामट्या पत्रकाराची
प्रचाराला भाड्याने, पगाराने लोक, इतकी वाईट वेळ? आता “पैसा लो, मत दो” हा पॅटर्न चालणार नाही.
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये, हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महिला व पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला जाणार असल्याची खळबळ जनक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील मतदार, शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत दिसून आल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे समजते.
दोन दिवसापूर्वी एका उमेदवाराच्या प्रचारासाठी शहरात प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये हातकणंगले तालुक्यातील महिला व पुरुष सहभागी झाल्याचे शिरोळातील मतदार सांगत आहेत. प्रत्यक्षात सहभागी झालेले लोक पगारावर आले होते?. की, मतदार म्हणून उपस्थित होते?. की, वरिष्ठांना, शिरोळच्या उमेदवाराला किती मोठा पाठिंबा आहे हे दाखवून निवडणूक फंड काढून घेण्यासाठी पाचारण करण्यात आले होते?.अशा सवालातून उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे कळते.
बाहेरच्या विधानसभा मतदारसंघातील मतदार शिरोळातील मतदार आहोत असे भासवून प्रचार करतात, इतके वाईट दिवस आले आहेत का? प्रचारासाठी, भाड्याने पगाराने लोक आणावे लागतात, अशा अर्थाने शहरातील मतदारांमध्ये प्रश्न-उत्तरांची चर्चा सुरू असल्याचे समजते. वास्तविक पाहता शिरोळमधील निवडणूक पैसा लो मत दो अशी होणार नसून भ्रष्टाचाराला मूठमाती देण्यासाठी होणार असल्याचे मतदार बोलत आहेत.
“घुशीं”चा बंदोबस्त, विकास आघाडी जयसिंगपूर पॅटर्न शिरोळमध्ये राबवणार
आपले मत वाया घालवू नका, योग्य उमेदवारालाच द्या.शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत आम.बंटी पाटील, मा.खा. राजू शेट्टी आणि दत्त साखरचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांनी यादव पॅनेलला उघड पाठबळ देत इरादा स्पष्ट केला असून नगरपरिषदेला “घुस” लागता कामा नये, यासाठी खास गोपनिय बंदोबस्त केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जयसिंगपूर शहरात ज्या पद्धतीने एकत्रित आघाडी करून धोरण ठरण्यात आले, त्याच पद्धतीचे धोरण शिरोळमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यासंबधीचा तालुका पातळीवर आराखडा तयार करण्यात आला आहे.यात शिरोळ व हातकणंगले तालुका तसेच स्थानिक पातळीवरील खेकटेखोरांची “राजकीय हद्दपारी” असा विषय “अजंट्यावर” घेतल्याचे समजते.
स्थानिक पातळीवर मा.खा.राजू शेट्टी व गणपतराव पाटील यांचा यादव पॅनेलला पाठिंबा, घुशीचा बंदोबस्त, जयसिंगपूरचे धोरण शिरोळमध्ये या महत्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन मतदारांनी आपले मत योग्य उमेदवाराला देण्याची गरज असल्याची चर्चा आहे, याची काळजी घेण्याची जबाबदारी आता मतदारांवर येऊन पडली असल्याचे जाणकार बोलत आहेत.