“एक मत” मागण्यावरून दोघात झाला वाद, इयत्ता “9”वीत शिकतोय काय ? अशा उत्तराने फटकारले.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
लवकरच बातमी वाचा : एका बाळी माळू नावाच्या भामट्या पत्रकाराची
संपूर्ण आघाडीच्या उमेदवारांना मतदान मागण्याऐवजी मला माझ्यापुरतं एकट्याला एक मत द्या असा प्रचार करून मतदारांची व पॅनलची दिशाभूल केली जात असल्याच्या रागातून नगरसेवक पदाच्या दोन उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. एकट्या पुरते मतदान मागणारा उमेदवार सर्वसाधारण पुरुष तर, दुसरा उमेदवार ओबीसी महिला वर्गातून निवडणूक लढवत असल्याचे समजते.
निवडणूक रिंगणात उतरत असताना दोन्ही उमेदवारांनी ठरलेल्या धोरणाला कटीबद्ध राहण्याचे एकमेकांना अभिवचन दिले होते. यात ओबीसी उमेदवाराने, सर्वसाधारण उमेदवाराच्या खर्चासाठी लाखो देण्याचे ठरले होते. त्यानुसार त्या उमेदवाराने त्याची पूर्तता केल्याचे समजते. प्रभागात मतदारांचा मिळणारा अल्प प्रतिसाद, बाबा, मामा, तात्या, काका मंडळीनी लावलेल्या फिल्डींगमुळे पराभव अटळ असल्याची खात्री झाल्याने त्या उमेदवारासह संपूर्ण कुटुंबाने इज्जत, प्रतिष्ठा आणि अब्रुसाठी स्वतःपुरते एक मत मागण्याचा खेळ सुरू केल्याची चर्चा आहे.
त्या उमेदवाराला, लाखो मिळाल्यानंतर, चांगलाच जोश वाढला. त्याने नेहमीप्रमाणे आपली चाल केली. गंडीवफशिवचे फासे टाकून, थेट पलटी मारली. आणि लाखो दिलेल्या उमेदवाराला एक मत का मागतोस? अशी उलट विचारणा करून तंबी दिली. पण, निर्दोष ओबीसी उमेदवाराने लागलीच पलटवार केला, पराभवाची भिती कोणाच्या पोटात आहे? कोण एक मागत आहे?, याचे आमच्याकडे पुरावा असल्याचे सांगून सर्वसाधारण उमेदवाराला निरमा लावून धुऊन काढत, त्याची बोलती बंद केली आणि मी काय इयत्ता “9”वीत शिकतोय असे वाटले काय ? असा सवाल करून हा प्रकार “राजर्षी शाहू महाराज” यांच्या ध्येय धोरणाला डाग लावणारा आहे, असे स्पष्ट सुनावल्याची अशी चर्चा आहे.
त्या दोन उमेदवारांची, एक मत मागण्यावरून शाब्दिक चकमक उडाली?. पण त्यांचे बहुतांशी उमेदवार सुरुवातीपासूनच स्वतःपुरते एक “मत” मागत असल्याचे मतदार बोलत आहेत. “एक” मत मागण्याच्या प्रकारामुळे प्रभागवार उमेदवारामधील बिघाडी, बेबनाव चव्हाट्यावर आला असल्याची शहरात चर्चा रंगल्याचे समजते.