विजयी उमेदवार, पराभूत होणार?, आधुनिक टेक्नॉलॉजीने ईव्हीएम घेतले जाणार नियंत्रणात?
कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यामध्ये भाजपाचे कटकारस्थान असल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. याला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हे अपवाद ठरू शकत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाला फारसे यश येणार नाही, अशी खात्री झाल्याचे समजते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरच महापालिकेचा निकाल अवलंबून रहाणार आहे. महापालिका निवडणुक निकालापूर्वी पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तर, भाजपाला मोठी शिकस्त सहन करावी लागणार आहे. शिवाय विधानपरिषद आणि राज्यसभेमधील संख्याबळ घटनार आहे, या भितीपोटी भाजपाने ईव्हीएम मशीनवर नियंत्रण ठेवण्याकरिता निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतमोजणी पुढे ढकलल्याची चर्चा आहे.
बहुतांशी नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये महायुतीला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. जसे की, शिरोळमध्ये शिव शाहू प्रणित यादव पॅनेलला मतदारांनी उचलून धरले. या ठिकाणी योगिता कांबळे नगराध्यक्ष होणार आहेत. त्यामुळे भाजपा महायुतीचे स्थान डळमळीत होणार आहे, सत्ता कोणाचीही असो पण, नगराध्यक्ष भाजपा युतीचा असला पाहिजे असे धोरण भाजपाने अवलंबल्याचे समजते.
बिहार मधील निवडणुकीप्रमाणे यंत्रणा हलवायची असेल तर, ईव्हीएम मशीनवर नियंत्रण? असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मिळालेल्या मुदतीत ईव्हीएम नियंत्रणाखाली घेऊन भाजपा महायुतीच्या उमेदवारांचे बळ वाढवून त्यांना सत्तेत बसवणे भाजपाला . सहज ,सोयीस्कर आणि सोपे होणार असल्याची चर्चा मतदारात करीत आहेत.
ईव्हीएम मशीन नियंत्रित केल्यानंतर निवडणुकीच्या स्पर्धेतील एक नंबरचा उमेदवार दहा नंबरला आणि दहा नंबरचा उमेदवार एक नंबरला येऊ शकतो?. आणि असे करण्यात भाजप कुठेही कसूर करणार नाही. लोकशाही धाब्यावर बसवायला घाबरणार नाही?, अशी भीती सध्या, नगरपरिषद, नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये व्यक्त केली जात असल्याचे समजते.