“इस्त्रीलंपट”,”खबरे”,”पगारखाऊ”,”न्यायालयीन आदेश” न पाळणाऱ्यांना लांब पल्ल्याच्या शर्यतीसाठी राहावे लागणार सज्ज
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शहरातील मतदारांनी निवडणूक हातात घेऊन यादव पॅनेलला विजयी करून “सत्तांतर” करण्याचा जसा निर्णय घेतला. तसाच निर्णय नगरपरिषदेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यात करण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त समजून येत आहे.
“इस्त्रीलंपट”, “पगारखाऊ”, गुन्हे दाखल असणारे, बनावटगिरी, “न्यायालयीन आदेश धाब्यावर बसवणे”, धतिंगखोरी, “भ्रष्टाचार” करून “खबऱ्या”चे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लांबच्या नगरपरिषदेचा रस्ता दाखवून “बदलांतर” केले जाणार असल्याची चर्चा आहे. बदलांतराचा निर्णय शिरोळ शहरासाठी “पारदर्शी” आणि “नगरी हिताचा” ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
शिरोळ नगरपरिषदेमधील काही कर्मचारी स्वतःला जिल्हाधिकारी, जिल्हा सह आयुक्त, आणि मुख्याधिकारी समजतात. कोणतेही अधिकार नसताना नागरिकांना अभद्र वागणूक देत असल्याची चर्चा आहे. काही दिवसापूर्वी स्वतःला “पंत” मंडळींचा “प्रधान” होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोपऱ्यात घालून धुतल्याची चर्चा आहे.
ठराविक कर्मचारी दुसऱ्याच्या टेबलवरचे काम स्वतःकडे घेऊन इतर कर्मचाऱ्यांना “लाचार” बनवून, “वेठिस” धरण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. तर, काहीजण दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील, “पगार गिळंकृत” करून “मिशी” वरून हात फिरवून “चतुर्थश्रेणी”च्या कर्मचाऱ्यांना रुबाब दाखवत असल्याची चर्चा आहे.
नगरपरिषदेमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे “गुन्हे” दाखल झाले आहेत, काही वर्षांपूर्वी “लाच लुचपत” प्रतिबंधक विभागाने धाड टाकून केलेल्या कारवाईमुळे नगरपरिषदेतील भ्रष्टाचार उघडकीस येऊन, शहराचे नाव “मलिन” करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासह अनेक घटना “बदलांतर”ला कारण ठरणार असल्याचे चर्चेत आहे.