नकली खेळकर चेहऱ्यावरुन जीव ओवाळून टाकलेल्या त्या प्रमुखाला फटका बसणार !
शिरोळ/इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
आपल्या प्रमुखाचा “विश्वास” संपादित करून त्याच्याशी वेगवेगळ्या पद्धतीची जवळीक साधून, गळ्यातील ताईत बनून, अंदाज घेवून, तो प्रमुख कसा “निष्क्रिय आणि अर्थकारणाशी” जोडला गेला आहे, “लाचलुचपत” मधून कसा वाचला, कृष्णा नदीकाठी बसून किती मासे जाळ्यात पकडले, पोलादी पार व जिलेटीनचा घाव घालून भु-गर्भाचा कसा गर्भपात केला हे दाखवण्याचे काम एका “लेडी सिंघम” लाखो मायेच्या सुपारी घेवून सुरू केल्याची चर्चा असल्याचे समजते.
“नागरी हिता विरोधी कार्य करून “खिसे” फुगवण्याची वृत्ती असणाऱ्या या “लेडी सिंघम”च्या पती देवाच्या हातातील “अशोक” चक्र वरिष्ठांनी काढून घेवून, त्याला एका कोपऱ्यात बसवून “कचरा” केल्यामुळे वरकमाईवर “बॅन” आला आहे. त्यामुळे कुटूंबाच्या उपजीविकेची सर्व सूत्रे “लेडी सिंघम”ने हातात घेतली आहेत. तर पतीदेव दररोज “कुंभार” कावळ्याचे दर्शन घेऊन किमान पगारा इतकी तरी माया मिळेल का ? या अपेक्षेने पायऱ्या झिजवत असल्याचे उभे आडवे धागे विणणाऱ्या शहरात बोलले जात असल्याचे समजते. सध्या, हा पतीदेव एकटे पडल्याने पोबारा करण्याच्या तयारीला लागला आहे. पण, सुट्टी नाही मिळणार.”
“उंचीने बाटुंगी आणि वृत्तीने बुटुंगी” असणाऱ्या “लेडी सिंघम”ने स्वतः प्रामाणिक असल्याचे भासवून, आपले प्रमुख कसे निष्क्रिय आहेत, हे दाखवण्याबरोबर पतीदेवांच्या वर कमाईचा फरक भरून काढण्याच्या दुहेरी संधीचा फायदा उठवल्याची चर्चा आहे. आपल्या साथीदारांना घेऊन, सिझनेबल “50 हजार आंबे” द्या, नाहीतर आत घ्या. असा दिवसा ढवळ्या कार्यक्रम सुरू केल्याची चर्चा आहे.
सर्वात “अजब” आणि बुध्दीची “किव” यावी असा प्रकार म्हणजे अस्तित्वात नसलेला कायदा आणि परिपत्रकात उल्लेख नसलेल्या नियम अटींचा कायदा स्वतः तयार करून तो बेकायदेशीररित्या राबवून “क्रांती” चित्रपटातील इंग्रजांच्या पाटीलकीची भिती घालण्याचा केविलवाना प्रयत्न ही “लेडी सिंघम” पटवर्धनांच्या मंडळात बसून करीत असल्याचे चर्चेत आहे.
“लेडी सिंघम”ने आपल्या नकली चेहऱ्यावर खेळकर वृत्ती दाखवून, प्रमुखाची “अंदर की बात” सातासमुद्रापार पोहचवली आहे. त्या शिवाय आपल्या प्रमुखाला ट्रक भरून “माती” चारायला सुध्दा ही “लेडी सिंघम” कमी पडणार नाही असे “शेतकरी” बोलताहेत. या “धुर्त” आणि “विश्वासघातकी” खेळीचा प्रमुखांना अद्याप अंदाज नाही पण, “अति तिथे माती” या म्हणी प्रमाणे संबंधित “लेडी सिंघम”कडून “केसाने गळा” कापल्यावरच प्रमुखांना कळणार आहे. परंतु, “उंदरावर” उगारलेली “काठी” “गणपती”ला लागणार हे विधी लिखित आहे.
आता उंदीर काकांचे कुरतडने कसे असते हे, नजीकच्या काळात न्यायालयाच्या पायऱ्या झिजवताना लक्षात येईल. आणि प्रमुख स्वतः “गम्मत जम्मत” चित्रपटातील लोकप्रीय गाण्यासम (….?…. ये ना ! ) गाणे गुनगुणत पश्चाताप करतील अशी चर्चा आहे.