बेकायदा मुरूम व वाळू वाहतुकीवरून शिरोळ तहसील व प्रांत कार्यालयाचे बिनसले ?
इचलकरंजी/शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
कर्नाटकातून आणि मिरज मार्गे शिरोळमध्ये होणारी बेकायदेशीर वाळू व मुरूम वाहतूक तसेच शिरोळ तालुक्यातून होणारी बेकायदा वाळू वाहतूक या दोन प्रमुख कारणाबरोबर बेकायदा नेमणुक केलेल्या 18 उमेदवाराना पुढे करून झाकूण केल्या जाणाऱ्या कारभारावरून शिरोळ तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय यांच्यात काहीतरी बिनसले असल्याची चर्चा शिरोळ व हातकणंगले तालुक्यात सुरू असल्याचे समजते.
साहेब, वाळू, मुरूम वाहतूक चालत नाही तर, बेकायदा उमेदवार कसे चालतात ? डोळेझाक का ?
दरम्यान, काही दिवसापूर्वी हेरवाड मार्गावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या दहा ट्रक पकडण्यात आल्या ? पैकी दोन ट्रकवर कारवाई करण्यात आली ?. बाकीच्या ट्रक कोणत्या अर्थाने सोडून देण्यात आल्या ? यावरून दोन्ही शासकीय कार्यालयात ठीणगी पडल्याची माहिती चर्चेत आहे. या शिवाय पुरस्काराला साजेशी असे काम करण्याकरिता बेकायदा उमेदवारांची हकलपट्टी करावी असाही अंतर्गत वाद पेटला असल्याचे समजते.
शिरोळ तालुक्यातील हेरवाड मार्गावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या ट्रक प्रकरणावरून अंतर्गत घमसान सुरू झाल्याचे चर्चेत आहे. परंतु, बेकायदेशीर वाळू वाहतूक प्रकरण कोणत्या कार्यालयाने गंभीर घेतले आहे ?, इचलकरंजी की, शिरोळ ?, कोणत्या कार्यालयाने कुठे गोपनिय बैठक घेतली ? त्या बैठकीत काय ठरले ? याची आजही तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे कळते.
स्मरणातील तीच “विषारी” वाळू आता “अमृत” कशी बनली ?
हेरवाड मार्गावर पकडण्यात आलेल्या दोन ट्रक व त्यातील वाळू कुठे आहे ?
शिरोळ तालुक्यात बेकायदेशीर रित्या कोणत्याही परवानगी विना कर्नाटकातून मुक्तपणे मुरूम वाहतूक होते, हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यवाण्याची गरज नाही. या वाहतुकीला सध्या तरी कोणतेही बंधन नसून “अर्थार्थी” मूक संमती असल्याचे समजते. सुरुवातीच्या काळात “विषारी” समजली जाणारी वाळू आता “अमृत” बनली आहे. या अमृताच्या लाभासाठी “त्या” बैठकीत चर्चेने सुखकारक मार्ग काढल्याची माहिती चर्चत आहे.