“प्रतापी” माध्यमने, “गांधीबाबां”च्या छायाचित्राचे कागद “चाटून” बच्चूचे नाव केले पुढे.
ती नगराध्यक्ष पदाची निवडणूक “राजू व संजू” विसरणार? नाही, “वचपा” काढणार !
डॉ. महोदय, पेशंटला ऍडमिट करण्यासाठी आपला आयसीयू उघडा ठेवा
शिरोळ/जयसिंगपूर/कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
शासनाच्या कोट्यावधी निधीमध्ये “कोट्यावधीची टक्केवारी” मिळण्याची हमखास “गॅरंटी” म्हणजे नगरपरिषद, खरं तर हे सूत्र सर्वांनाच लागू पडते, परंतू, खास करून ज्यांनी अबाउ “पाच टक्के टेंडर” काढून मलिदा खाल्ला आणि मूळ अंदाजपत्रकी टेंडरमध्ये “30 टक्क्या”चा “ढपला” पाडला, त्यालाच तंतोतंत जुळते. म्हणून नगरपरिषद निवडूक आली की, या व्यक्तींच्या तोंडातून “लाळ” गाळू लागते.
मुळामध्ये नगरपरिषद निवडणुकीत “सत्तेचे जुगाड” लावत, जाहीर केलेल्या आरक्षणाचा उमेदवार मिळत नाही, आणि मिळाला तर त्यांच्या जातीच्या दाखल्याची पडताळणी होत नाही. असे असताना “अनुसूचित जाती आणि जमाती”च्या आरक्षणातून नेमके काय साध्य करायचे आहे. तेच समजून येत नसल्याची नागरिकांची मते आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही अर्ध राजकीय तरुणांनी “पुढारपण”च्या नावाखाली, काही “प्रतापी” माध्यमला, “गांधीबाबां”चे छायाचित्र असलेले कागद “चाटायला” लावून स्वतःच्या उमेदवारीचे नाव पुढे केल्याचे पहायला मिळाले.
पण, “डॉ.बच्चू” एका घरात अनेक राजकीय पदे द्यायची नाहीत अशी मानसिकता ठेवलेल्या नागरिक, मतदारांनी तुम्हाला स्वीकारल्याची खात्री आहे का?, तुम्हाला स्वीकारणार का? (अजीबात नाही) याचा अंदाज न घेता “गुडघ्याला बाशिंग” बांधण्याऐवजी चक्क पायाच्या “अंगठ्याला बाशिंग” बांधल्याचे जाहीर आरक्षणानंतर दिसून आल्याची मतदार नागरिक बोलत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते जाणून घेण्याच्या प्रयत्न केला असता, नागरिक, मतदारांनी वशिलाबाजीने आरक्षण झाल्याचा आरोप करून ते अमान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या जात निहाय मतदारांची संख्या, इतर मतदारांच्या संख्येच्या तुलनेत कमी आहे, अशा मतदारांना आरक्षण कसे ? याच प्रश्नाने इतर मतदारात नाराजीची तीव्रता वाढवल्याचे पाहायला मिळत आहे.
आरक्षणाच्या अनुषंगाने मतदारात तीव्र नाराजी असताना, “पायाच्या अंगठ्याला बाशिंग” बांधलेल्या त्या “अर्ध राजकीय” तरुणाच्या स्वकीयांना मतदार गुलाल लावणे शक्यच नाही. शिवाय ज्या आघाडीच्या किंवा पक्षाच्या जीवावर शर्टाची कॉलर उभी केली जात आहे, पण, त्यांनी मागील सात वर्षा पूर्वी झालेली नगराध्यक्ष पदाची ती निवडणूक विसरली नाही. “राजू व संजू” “वचपा” हा काढणारच !
“गांधीबाबां”चे छायाचित्र असलेले कागद “पुढारपण”ला चाटायला लावून, वाजवला जाणारा “ढोल” फोडण्यासाठी अनेक “खमक्या” मतदार सज्ज असल्याचे समजते. वेळ आली की, कार्यक्रम तर होणारच ! त्या अगोदर पेशंटला ऍडमिट करण्यासाठी “डॉक्टर”ने आपला “आयसीयू” उघडा करून ठेवावा, अशी मते व्यक्त होताना दिसत आहेत.