आद्य दैवत “गजानन”ला आरती करून “युवराज” निखिल दादांच्या “मानसन्मान”, “स्वागत”चे परफेक्ट नियोजन केल्याची चर्चा !
सर्व साथीदारांची “पत”, “शोभा” वाढली, एका संशयित “प्रेम”पुत्रा” चे आव्हान, “स्टॅंडल” यशस्वी करण्यासाठी निखिल दादाची फक्त “छाया” पुरेशी !
घालवाड/लातूर/उमरगा : खमक्या वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यक्तिमत्व, भावी पीएसआय, फसवणूक खोरीचा बादशहा, बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी “निखिल उर्फ भाऊ बाबुराव खाडे” (रा. घालवाड ता. शिरोळ) याने, लातूर न्यायालयाच्या कोठडीतून जामीनावर मुक्तता करणाऱ्या वकिल साहेबाला “लाखाचा चुना” लावून पोबारा केल्याची खळबळजनक घटना समजून आली आहे.
निखिल दादांना “लातूर” न्यायालयातून जामीन मिळाला आहे. जामीन मिळताच त्याने पुन्हा आपल्या प्रवृत्तीचे दर्शन देत, थेट जामीन देणाऱ्या वकिल साहेबाचाच कार्यक्रम लावला. जामीन मिळाल्यानंतर तो “स्वगृही” परतण्याच्या चर्चेला उधाण आले. आद्य दैवत “गजानन”ला आरती करून “युवराज” निखिल दादांचा “मानसन्मान”, “स्वागत” करण्याचे परफेक्ट नियोजन करण्यात आल्याची चर्चा होती.
भावी पीएसआय निखिल खाडे साहेबांना जामीन मिळाल्यामुळे सर्व साथीदारांची “पत”, “शोभा” वाढली असून, आता आम्ही कोणाचाही दुसरा, तिसरा “पाय” काढू शकतो, असे आव्हान त्या सहा जणांची एका शोभा वाढवणाऱ्या एका संशयित “प्रेम”पुत्रा” ने दिल्याचे समजते. याशिवाय “स्टॅंडल” यशस्वी करण्यासाठी निखिल दादाची फक्त “छाया” पुरेशी असल्याचे तो आत्मविश्वासपूर्वक बोलत असल्याचे कळते.
लातूर न्यायालयाने भावी पीएसआय निखिल दादा खाडे साहेब यांना उद्या दि. 17 रोजी न्यायालयात हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. आता निखिल भाऊ हजर राहणार की, न्यायालयाला थुका लावणार ! हे उद्या सायंकाळपर्यंत समजणार आहे. दरम्यान, बलात्कार पीडित महिलेने धाराशिव जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांची भेट घेऊन फसवणुकीच्या गुन्ह्याबाबतची माहिती दिली. पोलीस अधीक्षक आमना यांनी लवकरच गुन्हा दाखल करून संबंधितांना जेरबंद करण्याचे आश्वासन दिल्याचे पिडितेने सांगितले.
सहा जणांना अर्थपुरवठा करणारा व आधारस्तंभ ठरलेला भाऊ खाडे याला कोणीही जामीन देण्यास तयार झाले नसल्याचे वरवरून म्हटले जात होते. परंतु, त्याला जामीन देण्यासाठी तिघांनी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. शेवटी “छैया” ने फिल्डिंग टाईट केली. खाडे सरांनी, वकिल साहेबांना “लाख मोलाचा” शब्द दिला. वकिल साहेबांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला. सर्व ताकद पणाला लावली. आणि खाडे दादांचा जामीन केला. पण, पदरात केवळ पश्चाताप.
सध्या, उमरगा पोलीस ठाण्यात निखिल खाडे आणि त्याच्या घालवाड, मुंबई येथील साथीदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, लातूर पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल मधून, खाडे याने पोलीस असल्याची बनावट आयडी, महिलांचे चॅटिंग , कॉल रेकॉर्ड बरोबर पोलिस खात्याला बदनाम करण्याबरोबर अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक, दमदाटी, धमकी दिल्याच्या माहिती घेण्यासाठी मोबाईल “फॉरेन्सिक लॅब” मध्ये तपासणीसाठी पाठवला आहे.