फिर्यादी जबाब मध्ये, राजकीय, व्यावसायिक, उठाठेव आणि रिअल इस्टेट, नोकरी करणारे आणि बँक सखी, व आधाराकरीता पत्नी म्हणून वावरणाऱ्या दोन महिलांच्या नावाचा उल्लेख !
खाडे सरांना जामीन देणाऱ्या वकीलांना, जामीन का दिला ? असा पश्चाताप झाल्याची चर्चा !
उमरगा/घालवाड : खमक्या वृत्तसेवा
भावी पीएसआय निखिल बाबुराव खाडे व त्याच्या अन्य साथीदारांनी संगणमत करून मुंबई मेट्रोमध्ये नोकरी लावण्याचे अमिष, खाडे साहेबांची गडचिरोली येथे झालेली बदली थांबवण्यासाठी जबरदस्तीने, धमकावून, दमदाटी करून 15 लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या विरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात फिर्यादी जबाब नोंदवण्यात आला आहे. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक आमनांच्या परवानगीने फिर्याद दाखल होणार असल्याचे पीडित महिले कडून सांगण्यात आले.
दरम्यान, उमरगा पोलिसांनी निखिल खाडे याने नोकरी लावतो म्हणून पैसे घेतलेल्या अन्य दोन महिलांचा आणि पीडित महिलेच्या आईचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी, सह आरोपी, चॅटिंग करून धमकी देणाऱ्या व उमरगा येथे जाऊन खंडणी वसूल करणाऱ्या महिला तसेच खाडे याने ज्यांच्या ज्यांच्याकडे पैसे दिले आहेत. अशा सर्वांच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे समजते.
फसवणूक करण्याबरोबर बँक सखी, व आधाराकरीता पत्नी म्हणून वावरणाऱ्या दोन, अशा तीन महिलांनी 9167133135 व 7710063324 या मोबाईल क्रमांकावरून धमकीचे चॅटिंग करून, टॉर्चर केले. तसेच आम्ही कोण आहे ? असा दबाव वाढवला, लगेचच पिडिताचा राग शांत करण्यासाठी, “तुझ्या इतकी मी सुंदर नाही”, “फोटो पाठवलाय बघ”. असे चॅटिंगमधून सांगितले. त्याचबरोबर उमरगा येथे येऊन, निखिल व दोन महिला यांनी रोखीने 50 हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याचे फिर्यादी जबाबात नमूद केले आहे.
एकूणच, खाडे याची प्रवृत्ती पाहता, तो जामीन मिळाल्यानंतर फरारी होण्याची शक्यता खरी ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खाडेला जामीन देणाऱ्या जामीनदाराला आयुष्यभरासाठी लातूर कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार आहेत. आणि खाडे मिळून नाही आला तर, कोर्टाकडून जामीनदाराच्या स्थावर, जंगम मालमत्तेवर बोजा नोंदवला जाणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे बोलले जात असून कदाचित जामिनदार जामिन सुध्दा काढून घेवू शकतो.
भावी पीएसआय निखिल खाडे यांने, पैसे कोणा कोणाकडे ठेवले आहेत, आणि कोणा कोणाला खात्यावर दिले आहेत, याची आकडेवारी सहित, संपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार फिर्यादी जबाब मध्ये, राजकीय, व्यावसायिक, उठाठेव आणि रिअल इस्टेट, नोकरी मध्ये काम करणाऱ्या व्यक्ती बरोबर दिपेंद्र भोवरा, विकास यादव, शुभम कांबळे, मनोजकुमार गौडा, अनिकेत गौडा, रोहित गिफ्ट कॅन्टीन, ब्रिजेश यांच्या नावाचा उल्लेख फिर्यादी जबाब करण्यात आल्याचे समजते.