आशा व गटप्रवर्तक थकीत मानधन लवकरच मिळेल ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सकारात्मक भूमिका ; नेत्रदीपा पाटील
मुंबई/शिरोळ ; खमक्या वृत्तसेवा
आमदार संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री फडणविस यांची भेट घेऊन आशा व गटप्रवर्तक यांच्या थकीत मानधना बाबत निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात भरघोस वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी थकीत मानधनाचा प्रश्न तात्काळ सोडवू असे आश्वासन दिल्याची माहिती आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या राज्याध्यक्षा नेत्रदीप पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत अशा व गटप्रवर्तकांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जमा करण्यात यावे. छत्रपती संभाजीनगर शहरातील आशा सेविकांना हजेरी ॲप मध्ये फोटो अपलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे, याबाबत लवकरात लवकर बैठक घेण्यात यावी. आशांना रजिस्टर देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना आदेश पारित करण्यात यावा.
गटप्रवर्तक निवडीचे निकष बदलण्यात यावेत, गाईडलाईन मध्ये दुरुस्ती करण्यात यावी. आशा वर्कर यांच्या युनिफॉर्मचा कलर गुलाबी ठेवण्यात यावा. आशा सॉफ्टवेअर सुरू करून, गटप्रवर्तकासाठी सॉफ्टवेअर भत्ता सुरू करावा. गटप्रवर्तकांचा पी.आय.पी मनुष्यबळ यामध्ये समावेश करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. आदी विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली.
बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मागण्याविषयी सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
चर्चत कोल्हापूर संघटनेचे राज्य सचिव डॉ. प्रविण चौधरी, जळगावच्या संजीवनी पाटील, मुंबई अध्यक्ष मानसी विटेकर, छत्रपती संभाजीनगर शहर प्रमुख , राधिका घाटगे, गटप्रवर्तक कोल्हापूर राज्य संघटक ,गटप्रवर्तक संघटना रेखा गायकवाड, छत्रपती संभाजीनगर, अर्चना जोशी यांनी सहभाग घेतला होता.