जामीन देण्यासाठी दोन लाख रुपये देतो असे आश्वासन देऊन, परस्पर फक्त आठ हजार रुपये खात्यावर पाठवून, जामीन मिळाल्यानंतर न्यायालयातून परस्पर पळून जाऊन, जामीन देणाऱ्या वकिलांची दोन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या “निखिल खाडे” या भावी “पीएसआयने” शनिवारी लातूर न्यायालयाच्या आदेशाला “कचऱ्याची”टोपली” दाखवल्याची माहिती समोर आली आहे.
भावी पीएसआय खाडे याला लातूर न्यायालयाने समन्स बजावून शनिवारी न्यायालयात हजर राहण्यासंदर्भातला आदेश दिला होता. परंतु, खाडे हा न्यायालयात हजर झालाच नाही. त्यामुळे त्याला न्यायालयातून “वॉरंट” काढण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, धाराशिवचे अप्पर पोलीस अधीक्षक आमना व उमरगा पोलिसांनी “फसवणूक”, “खंडणी”, “व्हाट्सअप धमकी, दाब, दबाव चॅटिंग” प्रकरणी निखिल खाडे याची साथीदारांमुळे वाढलेली “प्रतिष्ठा”, “शोभा” आणि “स्कॅन्डल” चालवण्यासाठी पुरेशी असलेली खाडेची “छाया” याचे मोजमाप करून टोळीचा पर्दाफाश करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले.
निखिल दादाच्या अडचणीत वाढ होऊ नये म्हणून त्याच्या निकटवर्तीय “युवराज” नामकाने दोन लाख रुपयांची जुळवाजुळव सुरू केल्याची माहिती समजून येत आहे. सध्या, भावी पीएसआय हे, जुळवाजुळवी करणाऱ्या “युवराज” नामकाच्या संपर्कात असून प्रतिदिन कमीत कमी दहा वेळा चर्चा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अॅड घुले यांनी एक “युवराज” नामक व्यक्ती, खाडे याच्या जामीनासाठी लातूर पोलीस ठाण्यात भेटला होता असे सांगितले.
तसेच मुंबई येथील शुभम कांबळे नामक एक व्यक्ती खाडे व त्याच्या मुंबईतील साथीदाराच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित कांबळे हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असून तो उमरगा पोलिसांच्या रडारवर आहे.