बेरजेच्या राजकारणासाठी मतदारात निर्माण केला जाताहे संभ्रम ? मतदारांनी दक्ष रहाण्याची गरज !
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू आघाडी आणि ताराराणी आघाडी पुरस्कृत भाजपा यांनी “सत्ता व बहुमत” यासाठी बेरजेचे राजकारण करण्याच्या दृष्टीने अत्यंत नियोजनबद्ध स्वतंत्र दोन पॅनल करण्याचा कार्यक्रम आखल्याची चर्चा आहे, कितीही ताकद लावली, कितीही पैसा खर्च केला तरी, मतदार पृथ्वीराजसिंह यादव यांच्याच पॅनेलला मतदान करणार याचा प्रमुखांना अंदाज आल्याचे समजते.
मतदारात यादव पॅनेल बद्दल निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे दोन्ही आघाडीच्या प्रमुखांनी “झाकली मुठ सव्वा लाखाची” अशी कुटनिती वापरून बेरजेच्या राजकारणासाठी गळ्यातून गळा काढायचा नाही. असा अंतर्गत निर्णय घेतल्याचे कळते. ही धुर्त खेळी मुळासह उपटून टाकण्यासाठी तरुण, युवक आणि मतदारांनी आत्तापासूनच कामाला लागावे अशी चर्चा आहे.
भाजपाचे लोटांगण?, आम. यड्रावकरांनी फटकारले?, कोल्हापुरातील बैठक?, दहा अकराचा फॉर्मुला? या सत्य व खऱ्याखुऱ्या घडामोडीची वस्तुनिष्ठता “खमक्या”ने वाचकांसमोर आणली. परंतु, राजर्षी शाहू आघाडी व ताराराणी आघाडी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एकमेकात मत भिन्नता असल्याचे भासवून, मतदारांना गाफील ठेवण्याचे प्लॅनिंग केल्याची चर्चा आहे.
भाजपा सुरुवातीपासून शाहू आघाडीशी सुत जळवून घेण्याच्या प्रयत्नात होते. त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या. दोन्ही आघाडीकडे इछूक असणारे तेच उमेदवार, उमेदवारी कोणाला द्यायची हा पेच, त्यामुळे दोन पॅनेल उभा करणे हा एकमेव पर्याय, दरम्यान, यादव पॅनेलने तगडे उमेदवार रिंगणात उतरवल्याची माहिती प्राप्त झाल्याचे मतदार बोलताहेत.
पर्यास्त, दोन वेगवेगळ्या आघाड्या करून सगळेच उमेदवार रिंगणात उतरवायचे, निवडणुक निकालानंतर सगळे एकत्र यायचे, बहुमत करून यादव पॅनेला सत्तेतून बाहेर करायचे आणि नगरपरिषदेचा ताबा घ्यायचा असा डाव केला असल्याचा मतदारांना दाट संशय असल्याचे समजते. आता डाव परतवून लावून यादव पॅनेलला बळ देण्याची जबाबदारी शहराने एकत्र येवून पार पाडावी अशी चर्चा आहे.