आ.यड्रावकर बंधूंनी, “बाबां”च्या योगदानाची परतफेड, उमेदवारी देऊन करावी.
शिरोळ : शरद काळे
शिरोळचे “भीष्माचार्य” म्हणून ओळखले जाणारे “प्रताप उर्फ बाबा पाटील” यांनी जनहितार्थ निवडणूक लढवावी. अशी संपूर्ण शिरोळ शहरातून मागणी होत आहे. बाबा पाटील यांनी राजर्षी शाहू आघाडीसाठी दिलेल्या योगदानाचा विचार करता आमदार यड्रावकर बंधूं यांनी, बाबा यांची सुरक्षित केलेल्या प्रभागातून उमेदवारी जाहिर करुन योगदानाची परतफेड करावी. अशी मते व्यक्त होत असल्याचे समजते.
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी स्वर्गीय दिनकररावजी यादव पॅनेल, भाजपा पुरस्कृत ताराराणी आघाडी आणि राजर्षी शाहू आघाडी यांच्यात लढत होण्याची शक्यता बळवली आहे. यादव पॅनेल कडून जवळपास सर्व प्रभागातील उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याचे समजते. परंतु, अधिकृत दुजोरा मिळत नाही.
ताराराणी व राजश्री शाहू आघाडीने उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच काही मातब्बरांनी, शहरातील महिला, पुरुष मतदार, नागरिकांचा कल व सहानुभूतीचा अंदाज घेऊन थेट “यादव” पॅनेलमधूनच निवडणूक लढण्याचा निर्धार करून, उमेदवारी घेतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यादव पॅनेलला पूरक असे वातावरण तयार होऊन, चौपटीने ताकद वाढल्याचे खुद्द मतदार बोलताहेत.
सध्या, उमेदवार जुळवा जुळवीसाठी सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागत असल्याची चर्चा आहे. वाड्या, वस्त्यावर, नगर, सोसायटी, फॉर्म हाऊस अशा ठिकाणी बोलावून घेवून उमेदवारी संदर्भात घळ घातली जात आहे. पण, “त्या” 12 जणांची प्रत्येकी 19 लाख प्रमाणे माया परत दिली काय ?, असा सवाल करून, पुन्हा तोच कार्यक्रम या खेपेला करायचा विचार दिसतोय, अशी त्या नागरीकांत चर्चा असल्याचे समजते.