
निवडणुकीनंतर “पंतप्रधान”ला, “साबण” लावून “धुवून” केले जाणाराहे “स्वच्छ”
शिरोळ/जयसिंगपूर/कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
नगरपरिषदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून, अधिकार गाजवून, स्वतः नगरपरिषदेचा “पंतप्रधान” होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका “इस्त्रीलंपट” कर्मचाऱ्याला काही संतप्त नागरिकांनी कोपऱ्यात घालून धु-धु, धुतल्याची खळबळ जनक माहिती चर्चेत आली आहे, सदर कर्मचाऱ्याला पुन्हा एकदा सुट्टीचा काळ पाहून चौकात साबण लावून धुतले जाणार असल्याचीही चर्चा आहे. “इस्त्रीलंपट” कर्मचाऱ्यांबरोबर एका सदग्रहस्थालाही नाहक गाल आणि पाठ चोळून घ्यावे लागले.
नगरपरिषदेमधील “इस्त्रीलंपट” कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे “अमोल” ठेवा असणाऱ्या नगरपरिषदेचे “चारित्र्य” धोक्यात येत असल्याचे नागरिक बोलत आहेत. त्यामुळे “पंतप्रधान” होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कर्मचाऱ्याचा खाजगीरित्या समाचार घेऊन सदरची “कीड” मारण्यासाठी जालीम औषध “फवारणी” करण्याची तयारी काही युवक मंडळींनी केली असल्याचे समजते.

स्वतः जिल्हाधिकारी, जिल्हा सह आयुक्त, मुख्याधिकारी असल्याचा टेंबा मिरवणाऱ्या व नगरपरिषदेचा “पंतप्रधान” असल्याचे भासवणाऱ्या “इस्त्रीलंपट” कर्मचाऱ्याला “त्या” मुख्याधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे कळते. त्यामुळे नजीकच्या काळात “त्या” मुख्याधिकाऱ्यांची “खुर्ची” आणि “प्रतिष्ठा” सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“पंतप्रधान” होण्याची स्वप्ने पाहणारा “इस्त्रीलंपट” कर्मचारी अधिकार नसलेल्या कामाची जबाबदारी घेवून “लंपटगिरी” करण्यात अडसर निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भट्टी लावण्याच्या तयारीत आहे. परंतु संतप्त युवक नागरिकांकडून निवडणुकीनंतर त्या “इस्त्रीलंपट” कर्मचाऱ्यांची चांगलीच भट्टी लावली जाणार असल्याचे समजून येत आहे.

