सन 2019 च्या प्रशासकीय कामकाजात घुटमळ्याखात काम करीत “32 हजार” रुपये बक्षीस जिंकणाऱ्या “क्लार्क”ने, डारडूर करून “18 कोटी”ची मनसोक्त “खाऊगिरी” करून पोटावर हात फिरवत पाच वर्षानंतर ढेकर दिली. तरीही, त्याची खाऊगिरीची हाव सुटायला तयार नाही. त्यामुळे यंदाच्या कामकाजातून पुन्हा “ढपला” पाडण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. गच्च भरलेले पोट तिजोरी, जमिनी, प्लॉट, गाडीमध्ये रिकामे करून पुन्हा “शपाई” पदातून “9” कोटी पळवण्याचा “चंग” बांधला आहे.
क्लार्क म्हणून काम करणाऱ्या इसमाने यापूर्वी समुदायांबरोबर संपूर्ण गावाला माझी ही शेवटचे कामकाज आहे, पुन्हा कामकाजात भाग घेणार नाही. अशी घोषणा “32 हजाराचे” बक्षीस मिळवण्यापुर्वी केली होती. क्लार्क पदावर राहून या इसामाने “अमरत्व”च्या नावाखाली मगर, अजगर अशा महाकाय प्राण्यांची भूमिका स्वीकारून कोट्यावधी गिळंकृत केले. पायउतार होताना त्याच्या पाठीराख्यांनी तू “बहाद्दर”च निघालास, अशी थाप देऊन बक्षीस म्हणून रोख “32 हजार” आणि “भीम” गदा तसेच “बुडव्या” शिल्ड प्रदान करून गौरव केला.
लुटमार करण्याची अभिलाषा काही केल्या सुटायला तयार नाही, म्हणून हा क्लार्क यंदा शिपाई होण्यासाठी, 9 मार्काची परिक्षा देणार आहे. तसा यंदाचा पेपर सोपा नाही. वेळ, काळ आणि तरूण, युवक या माजी क्लार्कला चादर गुंडाळून घरी बसवण्याच्या तयारीत आहेत. तसेच या क्लार्कच्या खाऊगिरी, बुडवेगिरी आणि लबाडी तसेच टक्केवारी कारभाराला कंटाळलेल्या अनेक तरुण युवकांनी “9” मार्काची परीक्षा देण्यासाठी शड्डू ठोकला आहे.
ढपला पाडणाऱ्या क्लार्कने, शिपाई पदाच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय केवळ खाऊगिरीसाठी घेतला असल्याचे दिसत आहे. परंतु, यामागे मोठे गोड बंगाल आहे. क्लार्क पदावर काम करताना केलेला 18 कोटीचा भ्रष्टाचार, अन्यायकारक कामकाज याची भांडाफोड होऊ नये. हातापाया पडून स्वतःचा बचाव करता येईल, यासाठी या टग्याने “9” मार्काची, शिपाई पदाची परीक्षा देण्याचा खटाटोप सुरू ठेवला आहे. परंतु, युवकांनी अशा खाऊगिरीला थारा मिळू नये यासाठी तरुण, युवकांनी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे.