“अपकार” वृत्ती गाढण्याबरोबर, अभिवचन पूर्ण करण्यासाठी शिरोळकर मतदार एकवटले.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळात टक्केवारीचे बस्तान कोणामुळे बसले? बगलबच्च्यांची प्रॉपर्टी कोणामुळे वाढली? बगलबच्च्यांना कोट्यावधीचा घनकचरा डेपो खाण्याची संधी कोणामुळे मिळाली? पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य, घरफाळा वसुली या विभागात मनसोक्त चरण्याची संधी कोणामुळे मिळाली? अशा अनेक प्रकारच्या संधी कोणामुळे मिळाल्या? तर, योगिता कांबळे यांच्यामुळेच…..
कांबळे यांनी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसता तर, शिरोळमध्ये नगरपरिषदच झाली नसती, मग, जयसिंगपूरकरांना शिरोळात येण्याची संधी निर्माण झाली असती काय? पाय ठेवायला जागा दिली नसती. याची जान ठेवून, योगिता कांबळे यांना बिनविरोध नगराध्यक्ष करायला हवे होते. पण, त्यांच्या उपकाराची परतफेड विरोध करून केली जात आहे. त्यामुळे शिरोळ शहरातील नागरिक, मतदार संताप व्यक्त करीत आहेत.
परोपकारी वृत्ती पोटावरून हात फिरवण्याची हाव टक्केवारी या अपप्रवृत्तींचे विसर्जन करून पृथ्वीराजसिंह यादव यांच्या पॅनेलच्या हातात सत्ता द्यायची असा पक्का निर्णय शिरोळकरांनी घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.सध्या, निवडणुकीनिमित्त राजकीय संघर्ष उफाळला आहे. अद्याप कोणतेही आरोप, प्रत्यारोप झाले नसले तरी, यादव पॅनेलच्या सर्व उमेदवारांना सभागृहात पाठवण्यासाठी खुद्द मतदारांनीच निवडणूक आपल्या हातात घेऊन प्रभागवार यंत्रणा उभा केल्याचे चित्र दिसत आहे.
यादव पॅनेलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता कांबळे यांना मतदान करायचे आणि शिरोळची सत्ता त्यांच्या हातात द्यायची असा पक्का निर्णय मतदारांनीच केल्याचे सांगितले जात आहे. पर्यायाने योगिता कांबळे यांना मिळणारा प्रतिसाद, पाठबळ, जनसंवाद रॅलीतील गर्दी, पॅनेलचे परफेक्ट नियोजन हे त्यांच्या विजयाचे साक्षीदार ठरणार आहेत.
उमेदवार योगिता कांबळे यांनी नगरपरिषद स्थापन करणे कामी आपल्या पंचायत समिती पदाचा राजीनामा देऊन खूप मोठे योगदान दिले आहे योगदान देतेवेळी संपूर्ण शहराने त्यांना नगरपरिषद निवडणुकीत सहकार्य करून निवडून आणण्याचे अभिवचन दिले होते. सध्या याच अभिवचनाची पुर्तता करण्यासाठी मतदार एकवटला असून कांबळे यांना नगराध्यक्ष करण्यासाठी झपाटून कामाला लागल्याचे दिसून येत आहे.