जयसिंगपूरचे “मुख्याधिकारी”, “दुसरे केबिन” आणि “कनेक्शन” याची जोरदार चर्चा.
जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष नीता माने यांचा सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला व्हिडिओ सध्या तुफान चर्चेत आहे. प्रशासक मुख्याधिकारी यांच्या कारभाराविषयी “दुसरे केबिन” असा शब्दप्रयोग करून कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. सध्या, “दुसरे केबिन” या शब्दावरून, जयसिंगपूर शहरात “कनेक्शन” अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण आणि संविधानिक शब्दांचा मारा करून माजी नगराध्यक्ष नीता माने यांनी मोठी भांडाफोड केल्याचे व्हिडिओ मधून दिसून येते. माने यांनी लोकशाही व संविधानिकता याचा मेळ घालून केलेले विधान तंतोतंत बरोबर आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणारे नसावे. असे मतदार बोलत आहेत.
अंतर्गत गोपनिय कारभाराचा बुरखा फाडण्याबरोबर, जयसिंगपुरातील राजकीय नेते व प्रशासन यांच्यामधील वेगवेगळ्या कामाच्या अनुषंगाने किती घट्ट “कनेक्शन” आहे. यावर थेट निशाणा साधला. नीता माने यांनी आपल्या मुलाखतीत विरोधकांच्या त्या छुप्या कारभाराची “दुखती नस” धरल्यामुळे संबंधित राजकीय गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे मतदार बोलत आहेत.
रस्त्यात घोटाळा, रस्ते गायब, जागा खरेदी विक्री मध्ये कोट्यावधीचा ढपला.
माजी नगराध्यक्ष नीता माने यांनी, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, नगरपरिषदेला कागदावर निधी आला, कागदावरच खर्च झाला, प्रत्यक्षात जमिनीवर त्या निधीतून कोणतेही काम झाले नाही किंवा खर्च केला नाही असे स्पष्ट वक्तव्य केले. प्रशासनाने आपल्या कार्यकालात रस्त्याच्या कामामध्ये राजकीय हस्तकांशी संगनमत करून “दुसरे केबिन”मध्ये बसून कसा घोटाळा केला, हे माने यांनी कळत न कळतपणे जनतेला पटवून दिले असल्याचे लोक बोलताहेत.
जयसिंगपूर मध्ये रस्त्यांच्या कामात प्रचंड मोठा घोटाळा असल्याची चर्चा आहे. भुयारी गटार, एसटीपी करिता खरेदी करण्यात आलेली जमीन कोणाच्या नावावर खरेदी केली? आणि किती कोटी रुपयात खरेदी केली? त्याची विक्री जयसिंगपूर नगरपरिषदेला किती कोटी रुपयात केली जाणार? याची मतदार ,नागरीकांनी शहानिशा केली तर, डोकीचे केस उभारल्याशिवाय राहणार नाहीत. यातून कोट्यावधीचा ढपला थेटपणाने उघड होणार असून शहरवासीयांची कशी फसवणूक केली जात आहे, हे समोर येणार असल्याची चर्चा आहे.