पतीचे कांड अन् शिक्षा पत्नीला ?, डॉ.माने मोजत होते…..नोटा? यादव पॅनेलवर करणीचे प्रकार ?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
विकास आराखड्यात “बुडव्या”च्या जमिनीवर आरक्षण का नाही? याचा विचार मतदानाला जाताना करा?
शिरोळ शहराच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात आम. राजेंद्र पाटील यड्रावकर व बंधू संजय यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोरगरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, मोकळे प्लॉट, अशा स्थावर मिळकतीवर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगणमत करून “32 हजार बुडव्या”ने रस्ते, बागबगीच्या, शाळा, मार्केट, क्रीडांगण अशी आरक्षणे टाकली. परंतु, “32 हजार बुडव्या”च्या जमिनीवर आरक्षण पडले नाही, टाकले नाही किंवा त्या वर्ग दोनच्या शासनाच्या जमिनीवर शासनाने ताडपत्री बांधलेली असावी म्हणून आरक्षण पडले नसेल? याचा बोध शहरातील सर्व नागरिक, मतदारांनी घेण्याची आवश्यकता असल्याची मते शेतकरी, नागरिक वर्गातून व्यक्त होत असल्याची चर्चा आहे.
शासनाने ऑनलाईन उपग्रहाद्वारे आरक्षण टाकले आहे, असे लोकांना खोटे सांगितले. तसे असेल तर शासनाच्या ऑनलाइन उपग्रहाला शासनाची ती वर्ग दोनची जमीन कशी दिसली नाही? म्हणून स्वतःचे शाबूत ठेवून दुसऱ्याच्या तोंडाचा घास काढून घेऊन त्यांचा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या “32 बुडव्या”ला सभागृहाबाहेरचा रस्ता दाखवायचा असा निर्णय मतदारांनी घेतल्याची चर्चा शिरोळ शहरात सुरू आहे.
मागील पाच वर्षे सत्तेत असणारे तुमचे उमेदवार काय करीत होते……?, मोजत होते….. नोटा?
शिरोळचा म्हणावा तसा विकास झाला नाही, असे भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतेच शिरोळ येथे वक्तव्य केले होते. परंतु, त्यांच्याच ताराराणी आघाडीकडून निवडणुक लढवित असलेला उमेदवार डॉ. अरविंद माने हे मागील कार्यकालात शेवटची पाच वर्षे सत्ताधारी व विरोधी मंडळींना मिठी मारून बसले होते, कामकाजात सहभागी झाला होते. त्यावेळी त्यांना शिरोळचा म्हणावा तसा विकास होत नाही हे लक्षात आले नाही? पैसे घेतलेल्या मतदारांनी त्यांना सभागृहात हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसायला पाठवले होते का? आता त्यांना स्वतःचा की, शहराचा विकास करायचा म्हणून निवडणूक लढवीत आहेत? असा सवाल शिरोळ शहरातील मतदार करीत असल्याचे चर्चेत आहे.
“32 हजार बुडव्या” पतीच्या उचापती, अवमान पचवण्याची वेळ आली, पत्नीवरती !
शिरोळमध्ये त्या महिलेने, उमेदवार प्रचारासाठी दोन-चार महिलांचा संच घेऊन प्रभागवार प्रचाराला सुरुवात केली आहे. साद-प्रतिसाद हा भाग गौण असला तरी, “32 हजार बुडव्या” बुडवेगिरी, “खोटी पत्रे व जबाब” देणे, ओला-सुखा कचरा खाणे, लोकांची घरे फोडणे, जमीनी हडप करणे, स्वतःची जमिन शाबूत ठेवणे असा पती देवांचा महाप्रतापी उद्योग, उचापती, घाणेरडे कारनामे यामुळे, मतदारांच्या दारात मते मागण्यासाठी जाण्यास अवमान वाटू लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
इतर महिलांना मते मागण्यासाठी पुढे पाठवून देऊन, स्वतः लपूनछपून, दडून, आडोशाला उभारण्याची वेळ आली. पण, मतदार महिला भगिनींचा मानसन्मान, आदर करतात, अन्याय सहन केलेल्या पीडित मतदारांचा संघर्ष “32 हजार बुडव्या” घाणेरड्या प्रवृत्ती विरोधात आहे. महिलांबरोबर नाही. याचा त्यांना कदाचित विसर पडला असावा. अशी ही त्या प्रभागात चर्चा सुरू होती.
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी भाजपा-ताराराणी आघाडीच्या काही उमेदवारांकडून अघोरी कर्मकांड, करणी, बाधा, चिटकुळ असे बेकायदेशिर प्रकार केले जात असल्याची चर्चा आहे. निवडणुकीत “विजय” मिळवून . प्रभागावर, एक नंबरचे “राज” करण्याच्या खोट्या आशेपोटी अंधश्रध्दाला आव्हान देत, लिंबू, नारळ, आंगारा, भंडारा, सुया बिबे अशा वस्तूंचा वापर करून मतदारांना भुलवण्याचा प्रयोग सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
मीच “निवडून” येणार, सर्वाधिक “हायर” मते मलाच मिळणार, विरोधी उमेदवाराचे “डिपॉझिट” जप्त होणार आहे, पराभवामुळे त्या उमेदवाराला “पृथ्वी”वर वास्तव्य करणे सुद्धा “मुश्किल” होणार आहे. लोक बघतीलच, मी कसा निवडून आलो ते ?असा “आत्मविश्वास” एक उमेदवार बोलून दाखवत असल्याचे समजते.
त्याचबरोबर एका प्रमुख महिलेने शिव शाहू प्रणित यादव पॅनेलच्या सर्व उमेदवारांचा पराभव व्हावा. यासाठी दोन महिन्यापूर्वी मिरज तालुक्यातील एका गावातून “लिंबू” करून आणल्याची चर्चा आहे. सदरचा “लिंबू” मतदानाच्या दोन दिवस अगोदर मतदान कक्षाच्या आवारात पुरण्यात येणार असल्याचे चर्चेतून समजून येत आहे, मात्र या घाणेरड्या, वृत्ती, प्रवृत्तीच्या कांडाविषयी अधिकृत दुजोरा मिळत नाही.