
पैशाच्या गठ्ठ्यांनी भरलेली मोटार गाडी, आचारसंहिता स्थायी पथकाने का अडवली नाही? का तपासणी केली नाही? की, संगणमत?
शिरोळ : मटन मार्केट चौकातून
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शुक्रवारी बारा वाजण्याच्या सुमारास एक मोटार वाहन तीन कोटी रुपये घेऊन शिरोळ मध्ये दाखल झाल्याची चर्चा आहे. हे मोटार वाहन कुरुंदवाड व शिरोळ आचारसंहिता स्थायी पथकाच्या तपासणीशिवाय शिरोळमध्ये दाखल कसे झाले? याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोट्यावधी रुपये घेऊन येणाऱ्या मोटार वाहनाला चेक पोस्टवरील स्थायी पथकाने का अडवले नाही? असा सवाल केला जात असल्याचे समजते.
तीन कोटी रुपये घेऊन आलेले मोटार वाहन अर्जुनवाड शिरोळ रोडवरील एका गोपनीय ठिकाणी थांबवण्यात आल्याची चर्चा आहे. या वाहनातून तीन कोटी रुपयांची रक्कम शिरोळ अर्जुनवाड रोडवरील मटन मार्केट जवळ लपवून ठेवण्याची माहिती चर्चेत आली आहे. इतकी मोठी रक्कम, मतदारांना निधी म्हणून वाटप करण्यासाठी आली असल्याची खात्री नागरिक व्यक्त करीत आहेत.
ज्या अर्थी, तीन कोटी रुपये घेऊन आलेले मोटार वाहन निवडणूक विभागाच्या चेक पोस्ट वरील स्थायी पथकाकडून अडवले जात नाही किंवा त्याची तपासणी करण्यात आली नाही, यावरून सदर घटनेची माहिती आचारसंहिता पथकाला असणार असा संशय व्यक्त केला जात आहे.


