निवडुण येण्यास मराठा मतदार चालतो, पण, याच मतदारांची किंमत शुन्य
शिरोळ/जयसिंगपूर/कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
सत्तेची अभिलाषा कधी सुटणार?, शिरोळ जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेत निवडुण येण्यासाठी मराठा मतदार हवे असतात. पण, उभ्या आयुष्यात मराठा नागरीक, मतदारांना किती किंमत दिली? याचे मोजमाप मराठा मतदार आता निवडणुकीत करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा मराठा मतदारांनी ताकद दाखवून “यादवी” माजवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्या अनुषंगाने सुक्ष्म नियोजन केल्याचे कळते.
जयसिंगपूरची सत्ता आबादित पाहिजे, शिरोळची सत्ता ताब्यात पाहिजे आणि कुरुंदवाडात सुद्धा वर्चस्व पाहिजे. तर, मग बाकीच्यांनी काय टाळ बडवायची? अहो, सगळं ताब्यात पाहिजे तर, राष्ट्रपती, केंद्र व राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाला सांगून सर्व निवडणुका रद्द करून जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड या तिन्ही नगरपालिका आयुष्यभरासाठी नावावर करून घ्या की, अशा संतापाने मतदारांत उद्रेक वाढल्याची चर्चा आहे.
शासन, नागरीकांची लुटमार करून, कंत्राटदारांना हाताशी धरून, टक्केवारीतून मिळवलेले पैसे निवडणुकीत वाटायचे, सत्ता मिळवायची अन पुन्हा चरत बसायचे हा धंदा बनला आहे. सत्तेच्या कार्यकाळात किती, लोकांच्या जमिनीवर आरक्षण टाकले आरक्षणातल्या जमिनी किती घशात घातल्या, हे सर्वसामान्यांना माहीत नाही असे समजण्याचे कारण नाही. तालुका ग्रामिण पातळीवरील शिरोळ, जसिंगपूर, कुरुंदवाड मधील एकूण 137 कोटी रुपयांचे रस्ते गायब? याची फिर्याद कुठे करायची? असा सवाल मतदार नागरीक करीत असल्याचे समजते.
नगरपालिकेला राज्याकडून किती कोटी रुपयांचा निधी येतो याचा अभ्यास, आलेल्या निधीची विल्हेवाट लावण्याचे तंत्र? त्यातून 40 टक्के कमिशन कसे काढून घ्यायचे याची शक्कल? शहराचा नाही तर स्वतःचा विकास करण्याचा स्वार्थ? कोट्यावधीचा ढपला हडपण्याची वृत्ती? वेगवेगळ्या बांधकामातून टक्केवारी घेवून झोळी भरून घ्यायची? अशा निरडावलेल्या सवई सुटायला तयार नाहीत. लुटमारीचा सराव झालाय त्यामुळे दुसऱ्याकडे सत्ता जावू नये अशी धारणा आसल्याचे जाणकारांचे मत आहे.