
दाणत दाखवण्यासाठी वापरलेले पैसे कचरा व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर लाथ मारून ढपलेले
शिरोळ/जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
नगरपरिषद निवडणूक निमित्ताने शिरोळ शहरातील सर्वाधिक जास्त चर्चेत असणाऱ्या व अटीतटीची लढत होणार अशी चर्चा असणाऱ्या प्रभागात, मतदारांना आकर्षित करण्यासाठी सदगुरूंच्या नावाने मेजवानी देऊन, चांदीच्या जोडव्याचे “90 जोड” वाटल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, जयसिंगपूर शहरात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराने आपला प्रचार थांबून मदत केल्यास त्याला 22 कॅरेटचे 25 तोळे सोनं ( 29 लाख 25 हजार ) देण्याची ऑफर ठेवली असल्याची माहिती समजून येत आहे. वाटप करण्यात आलेली जोडवी बनावट चांदीची (“9” टंच) असून मतदारांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. मात्र सोने वाटपाच्या विश्वसनीय आणि अधिकृत वृत्ताला दुजोरा मिळत नाही.
निवडणुकीत निवडून येण्यासाठी कोणताही उमेदवार घरदार, जमीन विकून मतदारांना पैसे वाटत नाही. मग, या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांकडे एवढा पैसा येतो कुठून? तर, तो विकास कामाच्या नावावरील टक्केवारीतून? यात शंका नसल्याचे मतदार बोलत आहेत.

पैसे बुडवणे ,खोटी पत्रे देणे. खोटा जबाब देणे अशी कलुशित सवय जडलेल्या उमेदवाराने बनावट का असेना पण, चांदीची (“9” टंच) जोडवी देण्याची दाणत पहिल्यांदाच दाखल्याचे त्या प्रभागातील मतदारांना अनुभवास मिळाल्याचे समजते. परंतु, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर लाथ मारून गावाचा कचरा खाणाऱ्या उमेदवाराला अशा पैशाचे कधीच सुख मिळणार नसल्याचे मतदार नागरीक बोलत आहेत.

