युवक, तरुण मतदारात संतापाची लाट, मतदानातून उत्तर देण्यासाठी शिवप्रेमी सज्ज
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना शहरातील बुवाफन महाराज उरूस कमिटी, मंडळाला, अनामत रक्कमेसाठी नगरपरिषदेबरोबर मोठा संघर्ष करावा लागल्याचे सर्वज्ञात आहे. उरूस साजरा करण्याचा मान मिळवण्यासाठी शहरातील मंडळांनी नगरपरिषदेकडे जमा केलेली अनामत रक्कम नगरपरिषदेने जयंतीसाठी दिली नसल्याची “धग” अजूनही युवक तरुणांच्या कायम असल्याचे दिसून येत आहे.
नगरपरिषदेने मंडळांना अनामत रक्कम का दिली नाही? अनामत रक्कमेची कोणी परस्पर विल्हेवाट लावली का ? ही रक्कम ठरावाने कायदेशीर बाबींसाठी वापरली की, परस्पर गायब केली? अनामत रक्कम चहापानासाठी वापरली की, उद्धारासाठी?, अनामत रकमेचा वापर फुले, हार तुऱ्यांसाठी केला? जमा अनामत रक्कमेने धुंदी वाढवली?. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी युवक-तरुण वर्ग सज्ज झाला असल्याचे समजते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शहराचा व तालुका ठिकाणची अस्मिता आहे. नगरपरिषदेने अनामत रक्कम दिली नाही. मग, पुतळ्याचे काय झाले असते? याचा विचार, तूर्तास तरी न केलेला बरा? अशा आशयाची अनेक उत्तरे आजही गुलदस्त्यात आहेत, असे म्हणणे उचित होणार नसल्याची शहरात चर्चा आहे.
शहरातील छत्रपती प्रेमी व विविध तरुण मंडळांनी या गंभीर बाबीचा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये गांभीर्याने विचार केल्याचे जाणकार बोलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या आडवे येत असतील?, अनामत रकमेवर डोळा ठेवत असतील? तर, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय तरुण-युवक, महिला-पुरुषांनी घेतल्याची मतदारात चर्चा आहे.
शहरातील ज्या-ज्या मंडळांनी उरूस कमिटीने हा प्रसंग अनुभवला, त्यांनी आता निवडणूक निमित्ताने उत्तर देण्याचे ठरविले असल्याचे समजते, आता अनामत रक्कम गायब केली असा आरोप करून, संताप व्यक्त करण्यापेक्षा शहरातील तरुण युवकांनी एकजुट करून प्रत्यक्षात “मता”च्या कृतीतून, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम, अस्था दाखवून द्यावे असा शहरात मतदारांनी प्रचार सुरू केल्याची चर्चा आहे. “लोहा गरम है, डाल दो हातोडा”