54 कोटीत तब्बल 18 कोटीचा शॉट दिलाय, फक्त एका कचऱ्यात 4.58 कोटी.
खमक्या : निमित्य निवडणुकीचे
आमच्या “हाक्या”न तर, अस ठरवलय की, स्वतःच्या विकासाठी गती कायम राखायची, मतदारांना दाखवलेला कागद, खोटे पणाचा दिखावा हाय, अनुभव नसताना एवढे केलयं, फक्त .मतदारांना विश्वास द्यायचा अन स्वतःचा विकास करायचा, स्व विकासाने श्रीमंती वाढल्या, तिजोऱ्या भरल्यात, शब्दात ताकद आणि हुकूमशाही दाखवायची अन विचार मात्र टक्केवारीचा करायचा.
संधी मिळाली तर, “बुडव्या”या शब्दाला कोट घालून स्वतःचा सर्वागीण विकास करायचा सोडायच नाही, आपल किती खोट कर्तुत्व हाय ते सगळ्या गावाला माहित आहे, स्वतःचा विकास झाला तरच उद्याचे भविष्य उज्वल होणार आहे. आणि “32 हजार” बुडवणे हिच खरी प्रगती आहे, स्व विकासाचा वेग कमी करायचा नाही, हिच बांधिलकी ठेवून जनता व शासनाला लुटायच. अशी चर्चा त्या प्रभागात रंगल्याची चर्चा आहे.
हे बघ, जनतेची दिशाभूल करून मते मिळवावी तर ती आम्हीच, विकास अजेंटाच्या नावावर कोट्यावधी रुपयांची तिजोरी कशी भरायची यात आम्ही आता ट्रेन झालो आहे, मतदारांना वरच्या मालकानं पाकीट दिले की, ते मतदान करतात. याचा अंदाज आल्यामुळे आता कुणाचा सल्ला घ्यायची आता गरज नाही. अशी चर्चा प्रभागातील कोपऱ्या कोपऱ्यावर होत असल्याचे समजून येत आहे.
54 कोटी मध्ये तब्बल 18 कोटी शॉट दिला आहे, कुणाला कळलं काय?. त्या 12 जणांना प्रत्येकी 19 लाख रुपये प्रमाणे गंडा घातला, कोण विचारायला आलं काय ?. कचऱ्यात दर महिन्याला 5.50 लाख रुपये पगार मिळवला. कचऱ्यात एकूण 4 कोटी 58 लाखाचा ढपला पडला, हेच काय, गाडी खरेदी करताना वरच्यावर एक लाख रुपये हाणलेत, घरात शेणघाण, स्वयंपाक आणि घरगडी यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वापर केलाय आणि काय पाहिजे.
जमीन, गाडी, घोड, मोटर गाड्या, प्लॉट, सोन या सगळ्याची खरेदी केली, काय केलय कोणालाच काही माहित नाही. स्वतः मग, आता काय कळणार आहे. जनता आणि आमचा समुदाय पण येडपट आहे, आमच्या वरच्या नेत्यांन हेच केलय आणि खालचा “हाक्या” पण हेच करतोय. आपल्याला काय मटणाचे दोन तुकडे आणि प्यायला दारू झाली म्हणजे बास. अशी दिलखुलासपणे चर्चा होत असल्याचे कळते.
मतदार जनतेच्या समोर 98 कोटीचा खोटा दावा ठेवलाय बघ. कुणाला काय कळतय ह्यातलं, केंद्राचे पैसे आणि काम सुध्दा केंद्राचच. पण, आम्हीच केलंय असा खोटा कागद दाखवलाय. या खेपेला जरा अवघड वाटतय पण, मतदारांना गंडवून मते तेवढी घ्यायची आणि नंतर वरबडत बसायच. असा डाव हाक्यान केल्याची चर्चा आहे.